मल्टिब्रँड फोटोग्राफीचा अनुभव देणाऱ्या पिक्सेल व्हिलेज डिजिटल सेंटरचं पुण्यात उदघाटन


 -     संगीत सिवन आणि दिव्या सेठ होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

-     क्रिएटर्स नुक्कड या तीन दिवसांच्या मास्टर क्लास सेमिनारलाही झाली सुरुवात 

-     सर्वोत्तम फोटोग्राफर करणार मार्गदर्शन

पुणे  पुण्यात नुकतंच पिक्सेल व्हिलेज डिजिटल या मल्टिब्रँड फोटोग्राफी एक्सिरियन्स सेंटरचं उदघाटन झालंफोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगमधले प्रोफेशनल्स आणि हौशी फोटोग्राफर्स या दोघांनाही नवीन फोटोग्राफी इक्विपमेंटसंबंधी शिक्षण देणं, सल्ला देणं आणि मार्गदर्शन करणं हे या सेंटरचं उद्दिष्ट आहे. प्रख्यात फिल्म आणि टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ यांनी या सेंटरचं उदघाटन केलं. सेंटरमधील पहिली खरेदी सुप्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांनी केली.

या कार्यक्रमात ब्रँडने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मही लाँच केला. ऑफलाईन आणि ऑनालाईन या दोन्ही पद्धतींनी ग्राहकांना सेवा देणाऱ्या या स्टोअरमध्ये फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि लायटिंगसंबंधी 16 हून अधिक ब्रँड्सची जागतिक दर्जाची उत्पादनं ग्राहकांना उपलब्ध होतील. संगीत सिवन यांनी आपल्या नव्या स्टुडिओसाठी काही प्रोफेशनल एलईडी लाइट्स खरेदी केल्याने ते स्टोअरचे पहिले ग्राहक ठरले.

या कार्यक्रमानंतर द क्रिएटर्स नुक्कड या तीन दिवस चालणाऱ्या मास्टर क्लास सेमिनारलाही सुरुवात झाली. फोटोग्राफीतील विविध जॉनर्समधील प्राथमिक माहिती आणि टेक्निकल ज्ञान, फिल्म मेकिंग, व्हिडिओग्राफी, लायटिंग आणि प्रिंटिंग या विषयांबाबत सुप्रसिद्ध फोटोग्राफर्सनी सेमिनारमध्ये मार्गदर्शन केलं. हौशी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर्सना या क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून ब्रँड च्या वतीने दर आठवड्याला वर्कशॉप्स आणि सेमिनारचं आयोजन करण्यात येणार आहे. यात आंतरराष्ट्रीय ब्रँड्सशी संबंधित तज्ज्ञ सहभागी होतील.

भारतीय चित्रपट दिग्दर्शक संगीत सिवन म्हणाले,‘ फोटाग्राफी आणि फिल्म मेकिंगमधील करिअर गेल्या अनेक वर्षांपासून अधिक विकसित झालंय. भारतातील अगदी दुर्गम भागांतील नागरिकही फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगमध्ये करिअर करण्यास उत्सुक आहेत. कॅमेरा आणि त्यासंबंधी उपकरणांमधील तांत्रिक बाबी तसंच तज्ज्ञता शिकून घेणं ही काळाची गरज आहे आणि याच वेळी महागडी उपकरणं विकत न घेता ती शिकण्याची संधी या सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे. माझी इथली खरेदी झाली आहे आणि योग्य उत्पादन खरेदी करण्याबाबत इथल्या मेंटॉरनी अगदी अचूक मार्गदर्शन केल्यामुळे मला आनंद झाला.  

फिल्म आणि टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ म्हणाल्या, ‘ हे सेंटर खूपच अप्रतिम आहे. इथं विद्यार्थी आणि ग्राहक उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ते वापरून बघू शकतील. इथे त्या उत्पादनाबद्दल इत्यंभूत माहिती दिली जाते आणि ग्राहक त्याच्या गरजेनुसार योग्य ते उत्पादन विकत घेईल हे सुनिश्चित केलं जातं. मला हे ठिकाण खूपच आवडलं.

भारतीय रंगभूमी, फिल्म आणि टीव्हीवरील ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा सेठ यांनीही या स्टोअरसाठी आपल्या सदिच्छा पाठवल्या आहेत. त्यात त्या म्हणाल्या,पिक्सेल व्हिलेज स्टुडिओमध्ये असलेली इक्विपमेंट्स आणि इथले स्टुडिओ पाहून मी प्रभावित झाले. हे दालन सर्वोत्तम आहे आणि पुण्यात असं दालन सुरू व्हायलाच हवं होतं. त्यांना भरपूर यश मिळो अशा सदिच्छा देते.

फोटोग्राफी गुरू आणि पिक्सेल व्हिलेजचे संस्थापक राधाकृष्णन चाक्यात म्हणाले, ‘कॅमेरा किंवा फोटोग्राफीसंबंधी इक्विपमेंट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकाला विकत घेण्यापूर्वी ती हाताळून बघता येत नव्हती हे त्याचं सगळ्यात मोठं दु:ख होतं. सध्याच्या पारंपरिक रिटेल स्ट्रक्चरमध्ये ग्राहकाला खरेदी करण्यापूर्वी वस्तू हाताळता येणं जवळजवळ अशक्य आहे. योग्य सल्ला मिळणं ही पण गोष्ट दुरापास्तच आहे. इथं पीव्हीडीत आम्हाला कोणतीही वस्तू विकायची नाहीए. आमची अशी इच्छा आहे की फोटोग्राफरने सगळं जाणून घेऊनच निर्णय घ्यावा.

ते पुढे म्हणाले, ‘जसं एखाद्या गाडीच्या शोरूममध्ये तुम्ही खरेदीपूर्वी ती गाडी चालवून बघू शकता अगदी तसंच इथं करता येईल. तुम्ही तुलना करा थर्ड पार्टी उत्पादनांची कॉम्बिनेशन्स करून बघा. काही दुर्मिळ अ‍ॅक्सेसरिज वापरून बघा. तुम्ही हे सगळं अनुभवी फोटोग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली करू शकता आणि ते उत्पादन विकत घ्यायलाच हवं असं बंधन तुमच्यावर नसेल. जर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची इच्छा झाली तर तुम्ही ई-कॉमर्स आणि ओटीसी सेल्सच्या माध्यमातून ती वस्तू खरेदी करू शकता. हे दोन्ही पर्याय फोटोग्राफीतील आघाडीचं   ऑनलाईन मार्केट असलेल्या Imaginext च्या सहकार्याने उपलब्ध होणार आहेत. आम्ही विक्री पश्चात सल्लाही देतो. आणि हेही पुरेसं वाटत नसेल तर आम्ही आमच्या सर्व ग्राहकांसाठी फ्री ऑनलाईन लर्निंग कंटेंट उपलब्ध करून देतो तसंच फ्री वीकली सेमिनारही आयोजित करतो.


पिक्सेल व्हिलेजबद्दल:

एक मिलियन सबस्क्रायबर्सचा टप्पा पूर्ण करण्याच्या जवळ असलेलं पिक्सेल व्हिलेज हे भारतातील सर्वाधिक सबस्क्राइब्ड असलेलं युट्युब चॅनल आहे. तीन दशकं कमर्शियल फोटोग्राफीचा अनुभव असलेले आणि फोटोग्राफीतील विविध ब्रँडसोबत काम करण्याचा 10 वर्षांचा अनुभव असलेले सुप्रसिद्ध फोटोग्राफर राधाकृष्णन चाक्यात यांनी 2017 मध्ये हा ब्रँड सुरू केला. पिक्सेल व्हिलेज क्रिएटर्स अ‍ॅकॅडमी (पीव्हीसीए) ही संस्था 10 हजार स्क्वेअर फुटांच्या परिसरात उभी आहे. ऑफलाईन अ‍ॅकॅडमी आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगचं शिक्षण देणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थांपैकी एक संस्था अशी पिक्सेल व्हिलेजची ओळख आहे. MESC शी संलग्न आणि सरकारमान्य असे आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी आणि फिल्म मेकिंगचे डिप्लोमा पीव्हीसीएकडून चालवले जातात. देशातील पहिली कॅनन इमेजिंग अ‍ॅकॅडमी आणि जगातील बहुतांश फोटोग्राफी, लायटिंग ब्रँड्शी पार्टनरशिप असलेल्या भारतातील अ‍ॅकॅडमींपैकी एक अशी पीव्हीसीएची ख्याती आहे.

पिक्सेल व्हिलेज डिजिटल हे स्टोअर पिंपळे सौदागरमधील स्पॉट 18 मॉलमध्ये आहे. अ‍ॅपलच्या धर्तीवर उभारलेल्या या स्टोअरमध्ये भरपूर मोकळी जागा उपलब्ध आहे त्यामुळे ग्राहक उपकरणं हाताळून, गप्पा मारून, चर्चा करताना कॉफी आस्वाद घेता-घेता उपकरण घेण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.

मल्टिब्रँड फोटोग्राफीचा अनुभव देणाऱ्या पिक्सेल व्हिलेज डिजिटल सेंटरचं पुण्यात उदघाटन मल्टिब्रँड फोटोग्राफीचा अनुभव देणाऱ्या पिक्सेल व्हिलेज डिजिटल सेंटरचं पुण्यात उदघाटन Reviewed by ANN news network on ३/२२/२०२३ १०:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".