मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यास 21 व्या वर्षीही शतप्रतिशत यश!



पुणे : धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे खडकवासला जलाशय रक्षण अभियान सलग 21 व्या वर्षीही शतप्रतिशत यशस्वी झाले. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान 7 मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून जनतेचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही. धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबविणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे. 

भगवान श्रीकृष्णाच्या प्रतीमा पुजनाने अभियानाला प्रारंभ झाला. या प्रसंगी खडकवासला मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. भीमराव (अण्णा ) तापकीर यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. खडकवासला विधानसभा मतदारसंघ आणि भाजपचे अध्यक्ष श्री सचिन मोरे, खडकवासल्याचे माजी सरपंच विजय कोल्हे, माजी नगरसेवक मा. बाळासाहेब नवले, व्यापारी संघटना पुणेचे अध्यक्ष श्री. गिरीश खत्री, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. 

     या वेळी श्री. भीमराव तापकीर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, ’’हिंदु जनजागृती समिती मागील 21 वर्षे 22 लाख लिटर पाणी स्वच्छ ठेवण्याचे कार्य करत आहेत, याबद्दल अभिनंदन! 

    खडकवासला पाटबंधारे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. विजय पाटील, खडकवासला पाटबंधारे पुणेचे शाखा अभियंता श्री. सुभाष शिंदे, खडकवासला धरण पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियंता श्री. दत्तात्रय कापसे, सिंहगड रोड, क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक श्री. रुपेश मते, अण्णासाहेब मगर कॉलेजच्या साहाय्यक प्राध्यापक सविता कुलकर्णी, गोर्हे बुद्रुकचे उपसरपंच सुशांत उपाख्य बाबा खिरीड यांनीही अभियान स्थळी भेट दिली आणि अभियानात सहभागी झाले. प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले अश्या प्रकारे सहभागी होत हे अभियान यशस्वी केले.अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 12 मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यास 21 व्या वर्षीही शतप्रतिशत यश!  मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यास 21 व्या वर्षीही शतप्रतिशत यश! Reviewed by ANN news network on ३/०७/२०२३ ०५:१८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".