पिंपरी : काळेवाडी, पिंपरी येथील वकील शिवशंकर शिंदे ३१ डिसेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील मदनूर येथे आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिंदे त्यांच्या काळेवाडी येथील कार्यालयातून ३१ डिसेंबर रोजी दुपारी बेपत्ता झाले होते. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी वाकड पोलिसठाण्यात तक्रार नोंदविली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. नातेवाईकांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद असल्याचा संदेश येत होता. नातेवाईकांनी यासंदर्भात सोशल मीडियावर संदेश प्रसारित करून शिंदे यांच्याविषयी कोणाला काही माहिती असल्यास ती देण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान त्यांचा मृतदेह मदनूर येथे अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला आहे.
पोलिसांनी शिंदे यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तेथे तुटलेली बटणे आणि रक्त आढळल्याने त्यांची अज्ञात व्यक्तीशी झटापट झाली असावी. त्यानंतर त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली असावी असा कयास पोलिसांनी बांधला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१/०२/२०२३ ०८:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: