मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी

 


लोणावळा : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका कारने पुढे चाललेल्या ट्रेलरला मागून धडक दिल्याने कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यानजिक तुंगार्ली गावाच्या हददीत किलोमीटर ५२ जवळ हा अपघात झाला.

दिपक अशोक नाटक (वय-२७, रा. तळेगाव दाभाडे, मावळ) असे मृताचे नाव आहे. तर राहुल कैलास जाधव (वय-२८, रा. तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय -५१, रा. खंडोबा माळ, आकुर्डी), रोहन भगवान वाघमारे (वय-२८, रा. पिंपरी) हे गंभीर जखमी झाले आहेत.


लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या ह्युंडाई अल्काझार कार क्रमांक एमएच १४ जेएक्स ९३८५ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही कार पुढे जाणाऱ्या ट्रेलरवर क्रमांक आरजे ०६ जीबी ७७८७ मागून जोरात धडकली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला. यामध्ये कारमधील दिपक नाटक यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर व खंडाळा महामार्ग पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथकाने घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहेत.

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी Reviewed by ANN news network on १/०२/२०२३ ०८:११:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".