पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथे वारकरी संस्थेतर्फे काकड आरतीचे आयोजन

 


पिंपळे सौदागर :  येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थे तर्फे  काकड आरती  सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले होते.महिनाभर  चाललेल्या  सोहळ्या मध्ये रोज पहाटे ४.३० ते ६.३० काकड आरती चे  आयोजन करण्यात आले होते.बुधवार दि.९ नोव्हेंबर २०२२ रोजी काकड आरती सांगता समारंभ संपन्न झाला.सांगता समारंभादिवशी सायंकाळी ५.०० ते ६.०० पर्यंत गावात मुख्य रस्त्यावरून दिंडी  मिरवणूक काढण्यात आली .सायंकाळी ६.०० ते रात्री ८.०० पर्यंत रामायणाचार्य ह.भ.प.महावीर महाराज सूर्यवंशी  (पुनवळे ) यांचे काल्याचे हरीकीर्तनाने काकड आरती सांगता समारंभ संपन्न झाला.यावेळी रामायणाचार्य हभप.महावीर महाराज सूर्यवंशी  (पुनवळे ) यांचा सन्मान मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच भाविकांना महाप्रसादाचे भोजन देण्यात आले. परिसरातील नागरिक ,ग्रामस्थ  भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. काकड आरती   आयोजन श्री.विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी मा.विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे,  संस्थेचे अध्यक्ष हभप.गणेश साहेबराव काटे,उपाध्यक्ष श्री.  दत्तात्रय नारायण काटे, खजिनदार श्री.भरत लक्ष्मण काटे,सेक्रेटरी श्री.विलास महादू काटे,कार्याध्यक्ष श्री.शंकर गुलाब चोंधे,श्री.शेखर सुखदेव काटे,हभप.विलास बाबुराव काटे,शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. संपत मेटे , शिवशंभो सेवा मंडळाचे संस्थापक श्री. ज्ञानेश्वर हांडे तसेच  आजी माजी पदाधिकारी  ग्रामस्थ उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथे वारकरी संस्थेतर्फे काकड आरतीचे आयोजन पिंपरी चिंचवड : पिंपळे सौदागर येथे वारकरी संस्थेतर्फे  काकड आरतीचे  आयोजन Reviewed by ANN news network on ११/१०/२०२२ ०७:०७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".