पिंपरी चिंचवड : आकुर्डीत बुधवारपासून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन..


भाविकांना सहभागी होण्याचे आयोजक विजय गुप्ता यांचे आवाहन...

पिंपरी  : काळभोरनगर येथील हनुमान मित्र मंडळ आणि गुप्ता-जैसवाल फाऊंडेशन यांच्या वतीने बुधवार (दि. ९) ते बुधवार (दि. १६) दरम्यान संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवडगावातील विसर्जन घाटावरून बुधवारी (दि. ९) रोजी सकाळी अकरा वाजता पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज यांच्या उपस्थितीत कलश यात्रेला प्रारंभ होणार आहे.  

या धार्मिक कार्यक्रमात कथा वाचन पं. पू. श्री. प्रद्युम्नजी महाराज वृंदावन, वारानसी (लंका) हे करणार आहेत. आकुर्डीतील खंडोबा मंदिर सभागृह येथे दररोज सायं. ४.३० ते रात्री ८.१५ वाजता कार्यक्रम होणार आहे.

भागवत कथा वाचनाला बुधवार (दि. ९) रोजी प्रारंभ होणार असून मंगल कलश यात्रा व बेदी स्थापनाही होणार आहे. गुरुवार (दि. १०) शुकदेव परिक्षित संवाद कर्दम चरित्र, शुक्रवार (दि. ११) जड भरत यांचे चरित्र, ध्रुव चरित्र, प्रघ्नाद चरित्र, शनिवार (दि. १२) वामन अवतार श्रीराम कृष्ण जन्मोत्सव, रविवार (दि. १३) बाल लीला, माखन चोरी लीला, चीर हरण व गोवर्धन लीला, सोमवार (दि. १४) द्वारिका लीला रुक्मिणी मंगल, मंगळवार (दि. १५) सुदामा चरित्र, परिक्षित मोक्ष शुकदेव पूजन, भागवत पूजन आणि बुधवार (दि. १६) रोजी पुर्णाहुति ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद वितरणाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा कथा सप्ताह समितीचे अध्यक्ष विजय गुप्ता आणि त्रिभुवन तिवारी यांनी केले आहे. 
पिंपरी चिंचवड : आकुर्डीत बुधवारपासून श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.. पिंपरी चिंचवड : आकुर्डीत बुधवारपासून श्रीमद भागवत कथा  सप्ताहाचे आयोजन.. Reviewed by ANN news network on ११/०७/२०२२ ०३:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".