पिंपरी : प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील झुलेलाल टॉवर सोसायटी,ट्रायोस सोसायटी या सोसायटी कडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काही कारणास्तव अनेक वर्ष रखडले होते. त्यामुळे सोसायटी मधील नागरिकानां पावसाळ्यात व इतर वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते,
माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे व माजी नगरसेविका शितल काटे यांनी आयुक्त यांच्याकडे व संबंधित मनपा विभागाशी वेळोवेळी पाठपुरावा केला होता व या रस्त्याबाबत लवकर तोडगा काढण्यात यावा अशा सुचना केल्या होत्या त्यानुसार आज या ट्रायोस व झुलेलाल टॅावर सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली नाना काटे व शितल काटे यांचे सोसायटी मधील नागरिकांनी आभार मानले आहेत.
पिंपरी : नाना काटे यांच्या प्रयत्नांमुळे रखडलेले रस्त्याचे काम मार्गी
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२२ ०५:०१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२५/२०२२ ०५:०१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: