उपक्रमशील विद्यार्थी हेच देशाचे उत्तम भवितव्य : प्रदीप जांभळे पाटील

 




पिंपरी : उपक्रमशील विद्यार्थी हेच देशाचे उत्तम भवितव्य आहेत, असे प्रतिपादन  अतिरिक्त आयुक्त  प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

थेरगाव येथील महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमाचे उद्‌घाटन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त  प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सी. टी. कदमकार्यकारी अभियंता देवन्ना गट्टुवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पवारक्रीडा पर्यवेक्षक कन्हेरेक्रीडा मार्गदर्शक बन्सी आटवेफुगे अरुणकृष्णराव टकले, संतोष शेडगेरायफल शूटिंग कोच विजय रणझुंजारे, अंजली चौगुले  शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

 अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले, महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  प्रत्येक अडचणींना तोंड देत विद्यार्थी दशेत मुलांनी सतत उपक्रमशील राहावे. तसेच आयुष्यात प्रगतशील रहावे स्वतः बरोबर समाज तसेच राष्ट्राची उन्नती साध्य करण्याचे ध्येय ठेवावे, असे असेही ते म्हणाले. यावेळी शाळेतील विविध उपक्रमास जांभळे-पाटील यांनी भेट दिली व माहिती घेतली.  शाळेच्या प्रगतीबद्दलशिस्त आणि क्रीडा क्षेत्रातील यश व नवनवीन उपयुक्त प्रकल्प तसेच नवीन क्षेत्र उपलब्धतेबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचेही कौतुक केले.



        महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालय थेरगाव येथील इयत्ता १० वी तील विद्यार्थ्यांनी ऑटोमोबाईल या व्यवसाय शिक्षणा अंतर्गत पेट्रोल व डिझेल यासारख्या महागड्या इंधनविरहीत चालणारी पर्यावरणाला पूरक असणारी ई बाईक तयार केली आहे. ही बाईक टाकाऊ वस्तुंपासून तयार करण्यात आली आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी  ई बाईकबद्दल माहिती सांगितली.  मागच्या चाकास हब मोटार लावून त्या मोटारला पॉवर देण्यासाठी ४८ व्होल्टची लिथियम बॅटरीचा वापर केला आहे. आणि  बॅटरीचे कनेक्शन बाईकच्या मागील चाकाला बसविलेल्या हब मोटारला दिले आहे. ही बॅटरी वाहन चालत असतानाच चार्जिंग व्हावी म्हणून त्यावर सौरउर्जानिर्मितीचे पॅनलही जोडण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

             या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीत रोडवर होत असलेले अनेक अपघात टाळण्यासाठी उपायोजनाचे सुचवले आहे. त्या उपायोजनेमध्ये दोन बाइक मध्ये आपण जर सेंसर  बसवले आणि त्या सेंसरमध्ये गाडी जवळ आली की ,आपल्याला सेंसरद्वारे सूचना मिळेल व होत असलेले अपघात टाळता येतील.  कोणाचीही जीवित हानी होणार नाही. याबाबत सेन्सर वर संशोधन चालू असल्याचे टोमोबाईल या तांत्रिक प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.



यावेळी विद्यालयास वॉटर कुलर व प्युरिफायर  प्रसव ऑटो कॉम प्रा.लि.चे मनिष जैन  यांनी भेट दिलेल्या स्टेनलेस स्टीलच्या ८० लिटरच्या वॉटर कुलरचे उद्‌घाटनही अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नव्याने तयार झालेल्या रायफल शूटिंग प्रकल्पासही भेट देऊन त्यांनी प्रसंशा केली. शाळेतील खेळाडू विद्यार्थ्यांसाठी राजेंद्र डिंबळे यांनी दिलेल्या १४ वर्षाखालील मुलींच्या संपूर्ण संघातील खेळाडूंना मोफत कीटचे वाटपही जांभळे पाटील हस्ते करण्यात आले.

उपक्रमशील विद्यार्थी हेच देशाचे उत्तम भवितव्य : प्रदीप जांभळे पाटील उपक्रमशील विद्यार्थी हेच देशाचे उत्तम भवितव्य : प्रदीप जांभळे पाटील Reviewed by ANN news network on १०/१०/२०२२ ०६:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".