खडकी : डिसेंबरमध्ये अग्रवाल समाजाचे महाअधिवेशन

 


खडकी :  अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या वतीने, वतीने संपूर्ण भारतातील अग्रवालांना जोडण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 24 ते 25 डिसेंबर दरम्यान महाअधिवेशनचे आयोजन डेक्कन कॉलेज ग्राऊंड, खडकी,येरवडा येथे करण्यात आले आहे. अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष  गोपाल शरण गर्ग, राजेश अग्रवाल, शिवकांत केतन, अनूप गुप्ता, अजय अग्रवाल यांनी दिली.

शनिवार 24 डिसेंबर 2022 रोजी  महाराष्ट्र राज्य प्रांतीय अधिवेशन  होणार असून यामध्ये महिला अधिवेशन, युवक अधिवेशन, व्यवसाय अधिवेशन, व्यापार उद्योग  प्रदर्शन, अग्रवाल गॉट टॅलेंट एंटरटेनमेंट आणि रविवार 25 डिसेंबर 2022 रोजी मुख्य प्रांतीय महाअधिवेशन व अग्र पुरस्कारांचे वितरण  आणि चर्चा सत्र होणार आहे.अग्ररत्न, अग्रविभूषण, अग्रभूषण, अग्रश्री, माता माधवी, युवारत्न सन्मान अशा अनेक पुरस्कारांचे वितरण या संमेलनात होणार आहे.

खडकी : डिसेंबरमध्ये अग्रवाल समाजाचे महाअधिवेशन खडकी : डिसेंबरमध्ये अग्रवाल समाजाचे महाअधिवेशन Reviewed by ANN news network on १०/२१/२०२२ ०६:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".