शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे ८५ टक्के काम पूर्ण (VIDEO)

 


पुणे : पुणेमेट्रोच्या शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे पूर्ण झालेले पहिले भूमिगत मेट्रो स्टेशन आहे. 

येथे शिवाजी नगर रेल्वे स्थानक, PMPML आणि MSRTC बस डेपो आणि हिंजवडी मेट्रो या सेवा एकत्र उपलब्ध असणार आहेत. भूमिगत स्टेशन हे मुख्य रस्त्यापासून 200 मीटर अंतरावर आहे आणि साखर संकुल ते आकाशवाणी भवन (AIR) ला जोडणाऱ्या रस्त्याखाली आहे. स्टेशनशी संबंधित इमारती रस्त्याच्या पातळीवर 200X20 मीटर परिसरात येत आहेत. भूमिगत स्टेशनसाठी खोदलेला रस्ता पूर्ववत केला जाईल. या संपूर्ण परिसराला व स्थानकाच्या क्षेत्रासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील परिसराचे स्वरूप आणि अनुभव देण्याचा प्रस्ताव महा मेट्रोने मांडला आहे.

आकाशवाणी,  पुणे आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे जुना मुंबई-पुणे महामार्ग जोडण्यासाठी पादचारी भुयारी मार्ग नेटवर्क. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी दोन भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत.  मेट्रो स्थानकात 5 लिफ्ट असतील.


भुयारी मार्ग कॉरिडॉर-1 चा भाग आहे आणि रेंज हिल डेपोपासून स्वारगेटच्या दिशेने सुरू होतो. शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी एकूण पाच भूमिगत स्थानके नियोजित आहेत.

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे ८५ टक्के काम पूर्ण (VIDEO) शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे ८५ टक्के काम पूर्ण (VIDEO) Reviewed by ANN news network on १०/१०/२०२२ १०:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".