'आंतरभारती' दिवाळी अंकाचे १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशन

 



पुणे : ज्येष्ठ कादंबरीकार आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख यांनी  संपादित केलेल्या 'आंतरभारती' या दिवाळी अंकाचे प्रकाशन लेखिका आणि मानवी हक्क कार्यकर्त्या डॉ.समिना दलवाई(सोनपत) यांच्या हस्ते १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच  वाजता एस एम जोशी सभागृह(नवी पेठ,पुणे) येथे होणार आहे.एमकेसीएल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ विवेक सावंत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.

यंदाचा आंतरभारती दिवाळी अंक हा 'स्वातंत्र्य , समता आणि बंधुता विशेषांक'आहे.त्यामुळे 'स्वातंत्र्य,समता आणि बंधुता' या संवैधानिक मूल्य त्रयींवर डॉ.समिना दलवाई,डॉ.विवेक सावंत या  मान्यवरांची व्याख्याने या प्रकाशन समारंभात होणार आहेत.अमर हबीब,डॉ.नितीश नवसागरे,डॉ.श्रुती तांबे,डॉ.डी.एस.कोरे,अंजली कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.




प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक  
'आंतर-भारती' या दिवाळी अंकाचे हे चौथे वर्ष आहे .आंतरभारती ही पूज्य साने गुरुजींच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय एकात्मता , भारताची बहू धार्मिकता , बहू सांस्कृतिकता , बहू भाषिकता , बंधुता व सहिष्णुता जोपासण्यासाठी आणि प्रबोधनासाठी गेली पन्नास वर्षे काम करणारी स्वायत्त संस्था आहे . प्रबोधनपर वैचारिक दिवाळी अंक ही आंतरभारती दिवाळी अंकाची आता सर्वमान्य व सर्वज्ञात ओळख बनली आहे .
मागील ७५ वर्षांत भारतीय नागरिकांना, खास करून दलित , वंचित , महिला व अल्पसंख्यांकांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचा किती लाभ झाला ? प्रत्येकाला खरे स्वातंत्र्य , खरी समता किती मिळाली ? समाजात बंधुता कितपत रुजली ? या साऱ्या प्रश्नांचा वेध घेणारे व या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान , संकल्पना आणि संविधानिक महत्त्व उलगडून टाकणारे वैचारिक लेख ,मुलाखती व परिसंवाद यांनी हा अंक संपन्न आहे . वाचकांना नवे मूल्यभान देणारा हा अंक आहे,असे डॉ लक्ष्मीकांत देशमुख यांनी सांगितले.

'आंतरभारती' दिवाळी अंकाचे १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशन 'आंतरभारती'  दिवाळी अंकाचे १४ ऑक्टोबर रोजी प्रकाशन Reviewed by ANN news network on १०/११/२०२२ ०४:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".