पिंपरी : दांडियासाठी लावलेला मंडप काढताना झालेल्या वादातून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यासह कुटुंबीयांवर हल्ला झाला आहे. यात रॉय यांच्यासह ३ ते ४ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हा प्रकार गुरुवारी रात्री काळभोरनगर येथे घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळभोरनगर येथील मांडव काढण्याचे काम सुरू होते. मांडववाल्याचे पार्किंगवरून रॉय यांच्या कुटुंबातील महिला सदस्यासोबत भांडण झाले. त्यावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
मंडपवाल्याने मुले बोलावून घेवून डॉ. रॉय यांच्यावर हल्ला केला. त्यात ७ ते ८ जण जखमी झाले आहेत.
मंडपवाले रमेश राऊत आणि डॉ. अनिल रॉय यांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांनी दोघांविरोधातही गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२२ ०९:२०:०० AM
Rating:
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: