बारामती : भंडारा डोंगर मंदिरासंदर्भात माजी आमदार विलास लांडेंसह देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षांनी घेतली शरद पवार यांची भेट
बारामती : भोसरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांनी रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेऊन देहुनजिकच्या भंडारा डोंगरावर बांधल्या जाणा-या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिराच्या उभारणीविषयी त्यांना माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, ह.भ.प. पंकज गावडे होते.
यावेळी पवार यांनी मंदिराच्या कामाची सर्व माहिती बारकाईने समजून घेतली. बाळासाहेब काशिद ह्यांनी मंदिराचे स्वरूप आणि चालू असलेल्या कामाची माहिती दिली. मंदिराचे बजेट, बांधकाम, बांधकाम शैली, त्याबाबत होत असलेले प्रयत्न ह्याबाबत सविस्तर सांगितले. पंकज गावडे ह्यांनी मंदिरामागचा आध्यात्मिक व सामाजिक उद्देश, गरज ह्या बाबत माहिती दिली. सर्व माहिती घेतल्यानंतर पवार यांनी समाधान व्यक्त केले.
Reviewed by ANN news network
on
१०/२३/२०२२ ०७:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: