पिंपरी चिंचवड : यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा एकनाथ पवार यांचा निर्णय



पिंपरी : भोसरी विधानसभेचे आमदार तथा भाजप शहराध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे याचं अल्पशा आजाराने निधन झाले. यामुळे भाजप प्रदेश प्रवक्ते एकनाथ  पवार यांनी (25 ऑक्टोंबर) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.    


राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून नुकसानग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असेही आवाहन एकनाथ  पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. 

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते तथा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा मंगळवार (दि. 25 ऑक्टोंबर रोजी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन एकनाथ  पवार यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड : यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा एकनाथ पवार यांचा निर्णय पिंपरी चिंचवड : यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा एकनाथ पवार यांचा निर्णय Reviewed by ANN news network on १०/२४/२०२२ ०१:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".