दिवाळीत वीज पुरवठा खंडीत होऊ देऊ नका : खासदार श्रीरंग बारणे

 


पिंपरी : वाढत्या नागरीकरणामुळे सांगवीथेरगाववाकडताथवडे सब स्टेशनवर क्षमतेपेक्षा जास्त वीज कनेक्शन आहेत. ताथवडे विभागाकडे 80 हजार ग्राहक असून केवळ एक डीपी आहे. त्यामुळे डीपीवर अतिभार (लोड) येत असून विजेची समस्या उद्भवत आहे. त्यासाठी थेरगावताथवडे आणि वाकड असे तीन भागात विभाजन करावे. त्या भागासाठी स्वतंत्र अधिका-यांची नियुक्ती करावी. जास्त क्षमतेचे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्यात यावेअशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. वेगाने नागरिकरण होत असलेल्या पुनावळेरावेतताथवडे या भागात आत्ताच सब स्टेशन उभारावेअशी सूचनाही त्यांनी केली.

 

पिंपरी-चिंचवड शहरातील विद्युत वितरणासंदर्भातील विविध प्रश्नांबाबत खासदार बारणे यांनी आज (शनिवारी) महावितरणच्या अधिका-यांसोबत बैठक घेतली. गणेशखिंड सर्कलचे अधिक्षक अभियंता सतिश राजदीपपिंपरी विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळीअतिरिक्त कार्यकारी अभियंता  गणेश चाकूरकरभोसरीचे कार्यकारी अभियंता उदय भोसलेसांगवीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय बालगुडेचिंचवडचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधवखराळवाडीचे भुजंग बाबरनिगडीप्राधिकरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी बैठकीला उपस्थित होते. दिवाळीच्या कालावधीमध्ये वीज पुरवठा खंडीत होता कामा नये. शहर वाढत असून नागरिकरणात झपाट्याने वाढ होत आहे. त्यानुसार महावितरणने नियोजन करावे. जागोजागी डीपी बसविणेकेबल टाकण्याच्या कामाचाही आढावा खासदार बारणे यांनी घेतला.

 

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, ''वाढत्या नागरीकरणामुळे सांगवीथेरगाववाकड सब स्टेशनवर क्षमतेपक्षा जास्त वीज कनेक्शन आहेत. एका सब स्टेशनवर 80 हजारांहून अधिक ग्राहकांचे कनेक्शन झाले आहेत. ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी झाली आहे. कर्मचारी कमी पडत आहेत. तक्रारींचे निराकरण वेळेत होत नाही. त्यामुळे या भागाचे विभाजन करावे. त्यासाठी वेगळे कार्यालय करावे. जेणेकरुन नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण होईल. कामे जलद गतीने होतील. डीपी उभारण्यासाठी बांधकाम व्यावसायीकांकडून महावितरणने जागा ताब्यात घेतल्या आहेत. परंतुकाही बांधकाम व्यावसायीक पुन्हा त्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतातअशा जागा ताब्यात देवू नयेत''.

 

''थेरगाव भागातील वीज पुरवठा खंडीत होतो. त्यासाठी नवीन केबल टाकाव्यात. ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी. धोकादायक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मरडीपी बदलावेत. पिंपरी संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे फिडरवर आरएमयू बसविणेएचटी केबल टाकावी. बॅक फिडसाठी एलटी केबलफीडर पिलर बसविण्यात यावे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. निगडीप्राधिकरणातही वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. महावितरणने निधीसह काही प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविले आहेत. तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. याबाबत मुख्यमंत्रीपालकमंत्र्यांशी चर्चा करुन प्रस्ताव मंजुर करुन घेतले जातील. निधी मिळवून दिला जाईल.  ही रखडलेली कामे मार्गी लागल्यावर शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल'', असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

 

कामे जलदगतीने करावीत

 

''शहरातील ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. कमी क्षमतेचे डीपी आहेत. डीपीची दुरावस्था झाली आहे. त्या भागातील जुने डीपी बदलून नवे डीपी बसवावेत. स्मार्ट सिटी अंतर्गत कामांसाठी ठेकेदारांनी रस्ते खोदल्यामुळे केबल तुटल्या आहेत. त्या केबल ठेकेदाराने बदलून देणे अपेक्षित होते. परंतुमहावितरणने सूचना देवूनही स्मार्ट सिटीकडून केबल बदलून दिल्या नाहीत. अशा विविध कारणांमुळे वीज पुरवठा खंडित होतो. पिंपळेसौदागरपिंपळेगुरवरहाटणी या भागात केबल तुटल्या आहेत. त्यावर तोडगा काढावा. महावितरणने हाती घेतलेलीभविष्याच्या दृष्टीने सुरु असलेली पुढची कामे जलदगतीने पूर्ण करावीत'', अशा सूचनाही खासदार बारणे यांनी केल्या.

 

नागरिकांचे फोन टाळू नका

 

''थेरगावकाळेवाडीरहाटणी या दाट लोकवस्तीच्या भागातून वीज पुरवठ्याबाबत येणा-या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतुमहावितरणकडून या तक्रारींची गंभीरपणे दखल घेतली जात नाही. तक्रार निवारण केंद्रात फोन उचलून बाजूला ठेवला जातो. नागरिकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. हे अयोग्य आहे. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढतो. तक्रारींचे प्रमाण जास्त असेल. परंतुनागरिकांशी बोलले पाहिजे. तक्रारीचे गांभीर्य समजून घेणे कर्मचारीअधिका-यांचे कर्तव्य आहे. नागरिकांसोबतचा संवाद तोडू नकानागरिकांना टाळू नकावस्तुस्थिती समजावून सांगावी. त्यामुळे नागरिकांचा रोष कमी होईल'', असेही खासदार बारणे म्हणाले.

दिवाळीत वीज पुरवठा खंडीत होऊ देऊ नका : खासदार श्रीरंग बारणे दिवाळीत वीज पुरवठा खंडीत होऊ देऊ नका : खासदार श्रीरंग बारणे Reviewed by ANN news network on १०/२२/२०२२ ०५:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".