पिंपरी चिंचवड : ३१ ऑक्टोबर रोजी जनसंवाद सभा

 


पिंपरी :  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या आठवड्यातील जनसंवाद सभा पुढील सोमवारी दि.३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये  दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. मात्र सोमवार  दि. २४ ऑक्टोबर २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने या आठवड्यात जनसंवाद सभा झाली नाही. मात्र त्यानंतर या सभांचे कामकाज नियमितपणे सुरु राहणार आहे. जनसंवाद सभा पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवार दि. ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत  होणार आहे. झालेल्या बदलाची नोंद नागरिकांनी घ्यावी असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणेतक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय दर सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेतते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भुषवत आहेत.

पिंपरी चिंचवड : ३१ ऑक्टोबर रोजी जनसंवाद सभा पिंपरी चिंचवड  : ३१ ऑक्टोबर रोजी जनसंवाद सभा Reviewed by ANN news network on १०/२५/२०२२ ०२:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".