लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग पतसंस्थेच्या निवडणुकीत चुरस




लोणावळा : लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग सहकारी पतसंस्थेची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी लोणावळा नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय शाळा क्र. १ येथे सकाळी साडेसात ते दुपारी चार या वेळेत होणार आहे.या निवडणुकीत  एकता सेवक विकास पॅनेल आणि  कामगार एकता सहकारी पॅनल परस्पराविरोधात उभी ठाकली आहेत. लढतीपूर्वीच एकता सेवक विकास पॅनेलचे ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले  असल्यामुळे १५ पैकी ११ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात आहेत. 

 एकता सेवक विकास पॅनेलचे ११ उमेदवार कपबशी चिन्हावर निवडणूक लढवत असून  कामगार एकता सहकारी पॅनलचे ढालतलवार हे चिन्ह आहे. एकता सेवक विकास पॅनेलचे जितेंद्र राऊत हे इतर मागास संवर्गातून, संतोष गिरी हे भटक्या विमुक्त जाती-जमाती (एनटी) संवर्गातून तर स्वाती गायकवाड आणि जयश्री रानवे या महिला गटातून बिनविरोध निवडून गेल्या आहेत. शिवाय कामगार एकता सहकारी पॅनलने ११ जागांसाठी केवळ ७ जणांनाच उमेदवारी दिल्याने उर्वरित ४ जागांवर एकता सेवक विकास पॅनेलचे उमेदवार निवडून येणार  असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वसाधारण गटात एकता सेवक विकास पॅनेलच्या वतीने अनिल अकोलकर, सुभाष बलकवडे, प्रकाश भोरडे, खंडू बोभाटे, संजय गुजर, प्रमोद हगवणे, सूर्यकांत हाळूदे, बबन कांबळे, मुरलीधर कांबळे, राजेश सपकाळ तर कामगार एकता सहकारी पॅनलच्या वतीने सुनील दहिभाते, श्रीकांत कंधारे, अंकुश खिल्लारे, अरुण मातेरे, अनंता टेमघरे, राजू वाघमारे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. अनुसूचित जाती-जमाती (एससी) जागेसाठी एकता सेवक विकास पॅनलचे चेतन सरवान, कामगार एकता सहकारी पॅनलचे अरविंद सोनवणे, अपक्ष उमेदवार नरेश साळवे यांच्यात तिरंगी लढत होत आहे.

 


लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग पतसंस्थेच्या निवडणुकीत चुरस  लोणावळा नगरपरिषद सेवकवर्ग पतसंस्थेच्या निवडणुकीत चुरस Reviewed by ANN news network on १०/२५/२०२२ ०७:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".