हजरत महमद पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक

 


मिरवणुकीद्वारे देणार शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरणाचे संदेश

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने रविवार, दिनांक ९ ऑकटोबर रोजी  ‘हजरत महमद  पैगंबर जयंती’(ईद-ए-मिलाद)निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८. ३०  वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन होऊन मिरवणुकीस प्रारंभ होईल.हजरत मोहम्मद पैगंबरांच्या संदेश, घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण असेल. संस्थेचे सचिव प्रा. इरफान जे. शेख,संस्थेचे संलग्न पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून, डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट, ‘ट्राय लक हॉटेल, गाय कसाब मशीद, बाबाजान दर्गा, सरबतवाला चौक, हुसैनीबाग, क्वार्टर गेट, मॉडर्न बेकरी, इस्लमपुरा, ए. डी. कॅम्प चौक, भारत सिनेमा, पद्मजी पोलीस चौकी, निशांत थिएटर, भगवानदास चाळ, चुडामण तालीम, पूना कॉलेज आणि आझम कॅम्पस गेट येथे मिरवणुकीची सांगता होईल.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे १८ वे वर्ष आहे.
हजरत महमद पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक हजरत महमद पैगंबर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांची भव्य अभिवादन मिरवणूक Reviewed by ANN news network on १०/०८/२०२२ ०३:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".