व्हायरल व्हिडिओ : वाचवा.... वाचवा..... बसड्रायव्हर किडनॆप करतोय

 


चिंचवड : पुणे तिथे काय उणे अशी एक जुनी म्हण आहे. ती पुण्यातील एक एक इरसाल नमुने पाहिले की खरीच असल्याची पुण्याबाहेरील लोकांना प्रचिती येथे. पण, पुण्याशेजारील पिंपरी चिंचवडमध्येही काही कमी नमुने अस्तित्वात नाहीत.

चिंचवडमध्ये एका प्रवाशाने पीएमपीएमएल बसचालकाचे आणि एका प्रवाशाचे भांडण झाले. त्याने बहुधा चालकाला शिवीगाळ केली असावी. चालकाने त्याच्या उतरण्याचे ठिकाण आल्यावर बसचा दरवाजाच उघडला नाही. त्यावरून पुन्हा दोघात बाचाबाची झाली. आणि मग त्या पठ्ठ्याने सरळ वाचवा.... वाचवा..... बसड्रायव्हर किडनॆप करतोय अशी बोंब ठोकण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून जाणारी वाहने बसभोवती उभी राहिल्याने बस थांबली. काही लोक बस थांबली आहे. आता उतर असे सांगू लागले. पण, दरवाजा बंद आहे. उतरू कसा? असा प्रश्न त्यांना विचारून तो बोंब ठोकतच होता. या सा-या प्रकाराने बसमधील प्रवाशांची चांगलीच करमणूक झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडिओ : वाचवा.... वाचवा..... बसड्रायव्हर किडनॆप करतोय व्हायरल व्हिडिओ : वाचवा.... वाचवा..... बसड्रायव्हर किडनॆप करतोय Reviewed by ANN news network on १०/१५/२०२२ ११:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".