पिंपरी
: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अचानक भेट दिली.
शहरातील विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत त्यांची बैठक झाली. अजित पवार यांच्या अचानक आगमनामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
दसऱ्याच्या
दिवशी थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात त्यानी शहरातील मोठ्या
हाऊसिंग सोसायट्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या आणि शहरातील इतर समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी अजित पवार महापालिकेत दाखल झाले असल्याचे वृत्त आहे.
यावेळी
त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेविका माया बारणे, मंगला कदम, माजी नगरसेवक मयूर कलाटे, राजू बनसोडे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
१०/०८/२०२२ ०४:३७:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: