पिंपरी चिंचवड : शहरात हजरत महम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

 



पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी प्रेषित हजरत महम्मद पैगंबर यांची जयंती  पिंपरी-चिंचवड शहर जुलूस कमिटीतर्फ़े उत्साहात साजरी झाली. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात यानिमित्त हैद्राबाद येथील  मुस्लिमधर्माचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ मौलाना अहमद नक्शबंदी  यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. 

या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी शहराच्या कानाकोप-यातून नागरिक मिरवणुकीने त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यात अनेक स्वयंसेवी मंडळांचा सहभाग होता तसेच शहरातील विविध मशीदी व मदरशातील मौलानांचा सहभाग होता. त्यासर्वांचा पिंपरी येथील कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 

यावेळी  पिंपरी, काळेवाडी, पवनानगर, श्रीनगर, नढेनगर परिसरातून तर, नेहरुनगर, लांडेवाडी, भोसरी, दिघी, संततुकाराम नगर, कासारवाडी परिसरातून तसेच चिखली, कुदळवाडी, पवार वस्ती, जाधववाडी, घरकुल परिसरातून या परिसरातून मुस्लिम बांधव पिंपरी येथे मिरवणूकीद्वारे एकत्र झाले.

पिंपरी चिंचवड जुलूस कमिटीचे अध्यक्ष युसुफ कुरेशी  आणि त्यांच्या सहका-यांनी कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन केले.


पिंपरी चिंचवड : शहरात हजरत महम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी पिंपरी चिंचवड : शहरात हजरत महम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी Reviewed by ANN news network on १०/०९/२०२२ ०९:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".