वनविभागाच्या जागा हस्तांतरण मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

 


पिंपरी  : चिखली परिसरातील वन विभागाच्या जागेचा ताबा प्रस्तावित हॉस्पिटलसाठी महापालिका प्रशासनाकडे देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. त्यामुळे समाविष्ट गावात आणखी एक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 चिखलीतील प्रस्तवित रुग्णालयाच्या जागेसाठी वन विभागाने ताबा द्यावा. यासाठी भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.

 या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश झाल्यापासून चिखली आणि परिसरात मोठ्याप्रमाणात नागरीकरण वाढले आहे. वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने या भागात शासकीय आरोग्य सुविधा अद्याप सक्षम नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उपचारांसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अथवा अन्य रुग्णालयांकडे धावाधाव करावी लागते.

दरम्यान, चिखली येथे वन विभागाच्या हद्दीतील गट क्रमांक 1653 मध्ये सुमारे 20.22 हेक्टर जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळाल्यास या ठिकाणी प्रशस्त रुग्णालय उभारता येईल. याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वन विभागाकडून जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला मिळणे अपेक्षीत आहे

सध्यावायसीएमरुग्णालयात पिंपरी-चिंचवडसह लगतच्या मुळशी, मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यांसह अन्य जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी येतात. तुलनेने खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळ तालुक्यातील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचा ताणवायसीएमवर येत आहे. त्यातील उपलब्ध मनुष्यबळ आणि विस्तार क्षमतेला मर्यादा आहेत. त्यामुळे वायसीएमला पर्यायी वैद्यकीय व्यवस्था उभी करणे पिंपरी-चिंचवडसह समाविष्ट गावांसाठी अत्यावश्यक आहे

त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा म्हणून चिखलीत तात्काळ रुग्णालय सुरू करणेकामी वन विभागाच्या ताब्यातील जागा महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरीत करावी. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणीही कुंदन गायकवाड यांनी केली आहे.


वनविभागाच्या जागा हस्तांतरण मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद वनविभागाच्या जागा हस्तांतरण मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक  प्रतिसाद Reviewed by ANN news network on १०/०८/२०२२ ०९:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".