पिंपरी चिंचवड : महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आरोग्य शिबीर

 


पिंपरी महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. 

  दि. ८ ऑक्टोबर  ते  ९ ऑक्टोबर २०२२ या कालावधी दरम्यान महर्षि वाल्मिकी यांच्या जयंती निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या ठिकाणी दि.८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे.

 आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असणार आहेत.  खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, आमदार उमा खापरे, लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, यांची प्रमुख उपस्थिती असेल. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप हे देखील उपस्थित राहणार आहेत.

            दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तसेच सकाळी  १०. ४५ वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच पिंपरी येथील महर्षि वाल्मिकी समाज मंदिर, मिलिंदनगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  यामध्ये सकाळी ११ वाजता महिलांसाठी खास “खेळ पैठणीचा” हा कार्यक्रम कुमार पाटोळे सादर करणार आहेत. दुपारी २ वाजता आकाश देवकर यांचा “करिअर मार्गदर्शन” कार्यक्रम होणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता विजय उलपे यांचा “हिंदी मराठी जुन्या नव्या गाण्यांचा कार्यक्रम” आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड : महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आरोग्य शिबीर पिंपरी चिंचवड : महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त आरोग्य शिबीर Reviewed by ANN on १०/०६/२०२२ ०८:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".