रावेत येथील नवरात्रौत्सवात विविध क्षेत्रात काम करणा-यांचा गौरव

 


पिंपरी : श्री द्वारकाधीश सेवा मंडळ आणि गरवी गुजराथी समाजातर्फ़े रावेत येथे नुकताच नवरात्रौत्सव नुकताच पार पडला. यावेळी शहरात विविध क्शेत्रात कार्यरत असणा-या सेवाभावी संस्था आणि नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार उमा खापरे उपस्थित होत्या. 

आमदार खापरे आणि श्री द्वारकाधीश  सेवा मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल, गरवी गुजराती समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, धनश्याम गजेरा, भरत दवे, ऋतिक पटेल, हार्दिक जानी, राम राज्यगुरु, जयन्ती राठोड, जिग्नेश पटेल, गिरधर विराणी यांच्या हस्ते या सर्वांना गौरविण्यात आले. 

यामध्ये अमित गोरखे (शैक्षणिक), सुर्यकांत मुथीयान (पर्यावरण) अशोक तनपुरे (पोलिस मित्र संघटना) जतीन परमार (मानवी हक्क सेवा) डॉ. गणेश अंबिके (आरोेग्य व आपत्ती व्यवस्थापन) गुलामअली भालदार (चिंचवड प्रवासी संघ) सुरज आसदकर (वृत्तपत्रातील डिझाईनर) सुहास जोशी (अन्नदान आरोग्य) विल्यम साळवी (व्यसनमुक्ती) यांना स्मृतीचिन्ह व शाल देवून गौरविण्यात आले. 

यावेळी किरण पटेल यांच्याहस्ते आमदार उमा खापरे यांचा खास स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मुकेश चुडासमा यांनी केले. आभार भरत दवे यांनी मानले.


रावेत येथील नवरात्रौत्सवात विविध क्षेत्रात काम करणा-यांचा गौरव रावेत येथील नवरात्रौत्सवात विविध क्षेत्रात काम करणा-यांचा गौरव Reviewed by ANN news network on १०/०८/२०२२ ०९:२१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".