पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील वीजसमस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी नुकतीच नव्याने स्थापन झालेल्या विज वितरण समितीची बैठक घेऊन पिंपरी मतदारसंघातील अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला.
यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार अण्णा बनसोडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.दत्तात्रय साळी(पिंपरीविभाग) कार्यकारी अभियंता श्री. भोसले(भोसरी विभाग), सदस्य सचिव तथा उपअभियंता गणेश चाकूरकर, सदस्य अजय चव्हाण, नितीन वाघमारे,दिपक साळवे यांच्यासह महावितरण पिंपरी व भोसरी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महावितरण अधिकार्यांनी शहरातील विजसमस्या व वितरण प्रणालीतील अडचणी बैठकीत मांडल्या महापालिकेमार्फत होणारी सततच्या रस्ते खोदाईमुळे विद्युत केबल डॅमेज झाल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होते. महावितरणला डॅमेज केबलचे ठिकाण शोधण्यात बराच वेळ जातो. परिणामी महावितरण अधिकार्यांना नाहक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची खंत अधिकारी वर्गाने बोलून दाखविली.
पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रस्ते खोदाईमुळे विद्युत वाहिनीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन व्हावे यासाठी महावितरण अधिकार्यां समवेत मनपा आयुक्तांशी संयुक्त चर्चा करून तोडगा काढू असे बनसोडे म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
१०/०१/२०२२ ०५:४१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: