शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.जी हरिदास यांचे निधन
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.जी हरिदास यांचे रविवारी दुपारी देहूरोड येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
देहूरोड येथे ओणम साजरा करण्यासाठी नायर सर्व्हिस सोसायटी (एनएसएस)या संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता. तेथे हरिदास भाषण करत होते. भाषण आटोपत आले असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने उपचारासाठी बाणेर येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी थंगमणी, मुलगा हर्ष व मुलगी हेमा असा परिवार आहे.
हरिदास यांची मुलगी सिंगापूर येथे असते. ती अंत्यसंस्कारासाठी येणार असल्याने त्यांचे पार्थीव दोन दिवस वायसीएम रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात येणार आहे. यांचे पार्थिव शरीर दोन दिवस पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या शवागरात ठेवण्यात येणार आहे.
एन.जी हरिदास हे नायर सर्व्हिस सोसायटीचे आणि श्रीकृष्ण चॅरिटेबल फाउंडेशनचे माजी अध्यक्ष होते. तसेच, चिंचवड मल्याळी समाजम व वर्ल्ड मल्याळी कौन्सिलचे ते पदाधिकारी होते.
शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष एन.जी. हरिदास यांचे निधन
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२२ ०५:०७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१८/२०२२ ०५:०७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: