भंडारा डोंगरावरील तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा : श्रीनिवास पाटील

भंडारा डोंगरावरील तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा : श्रीनिवास पाटील देहू : मावळची भूमी ही भक्ती-शक्तीची परंपरा असणारी भूमी आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना जिथे अभंग सूचले. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणार्‍या भंडारा डोंगरावरील मंदिर जगाला प्रेरणा देईल, तेथील मंदिराच्या उभारणीसाठी सर्वांनी जमेल तशी मदत करावी, एक रूपया मदत करावी. मणभर नाही, मनापासून मदत करायला हवी. किलोने नाही देता आले तरी किमान गुंजभर सोनं द्यावे, तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा, असे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी रविवारी भंडारा डोंगरावर व्यक्त केले. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने भंडारा डोंगरावर संत तुकाराम महाराज यांचे मंदिर साकारले जात आहे. मंदिराचे काम सुरू आहे. त्यामुळे आज विशेष संकल्पसभेचे आयोजन केले होते. यावेळी वारकरी संप्रदायभूषण शांतीब्रम्ह मारुतीबाबा कुर्‍हेकर, एमआयटीचे डॉ. विश्वनाथ कराड, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार नाना नवले, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी उल्हास पवार, न्यायमूर्ती मदनमहाराज गोसावी, बीव्हीजीचे हणमंत गायकवाड, आळंदी देवस्थानाचे डॉ. अभय टिळक, विकास ढगे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार कमल किशोर कदम, कृष्णराव भेगडे, बापू पठारे, डॉ. यु. म. पठाण, देहूदेवस्थानाचे अध्यक्ष नितीन मोरे, एमआयटीचे राहूल कराड, शिवसेना नेते राहुल कलाटे, देहू देवस्थानाचे माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, विजय बोत्रे, बापूसाहेब भेगडे, माजी महापौर संजोग वाघेरे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब भोईर, विश्वस्त मंडळ आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी प्रास्ताविकात मंदिर उभारणीची भूमिका सांगितली. मंदिराची माहिती दिली. तसेच मंदिराच्या उभारणीत मदत करणार्‍यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शांतीब्रम्ह मारूतीबुवा कुर्‍हेकर म्हणाले, ‘‘भंडारा डोंगराचे विशेष स्थान आहे. जगाच्या उधार करण्यासाठी संत तुकाराम महाराजांचा गाथा निर्माण झाला. तो पाचवा वेद आहे. देहू हे तुकोबारायांचे जन्मास्थान असले तरी भंडारा डोंगर हे गाथेचे जन्मस्थान आहे. तिथे मंदिर उभारले जात आहे. ही आनंददायी बाब आहे. ’’ उल्हास पवार म्हणाले, ‘‘संत तुकोबांनी आपल्याला जगण्याचे तत्वज्ञान दिले. या तीर्थक्षेत्राच्या विकासात योगदान देता आले ही भाग्याची गोष्ट आहे. गाथेच्या जन्मभूमीत मंदिर उभारले जात आहे. हा सुवर्ण पर्वत आहे. येथील मंदिर सुवर्णमय करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. सर्वांनी योगदान द्यावे.’’ विश्वनाथ कराड म्हणाले, ‘‘मंदिर उभारण्याचे धाडस वारकर्‍यांनी दाखवले. हे ज्ञानाचे तीर्थक्षेत्र आहे. स्वत्व, स्वधर्म, ज्ञानधर्म वाढविण्याचे काम संतांनी केले आहे. येथील गाभाराही सुवर्णमय असावा. त्यामुळे मी माझ्या कुटुंबातर्फे गाभारा सुवर्णमय करण्यासाठी माझ्या कुटुंबियातर्फे सोने देतो.’’ खासदार बारणे म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांचे चिंतनस्थळ असणार्‍या भंडारा डोंगरावर मंदिर उभारले जात आहे. तुकोबारायांचे हे मंदिर जगाला प्रेरणा देणारे ठरणार आहे.’’ आता मी कलेक्ट करतो माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ज्या कार्यक्रमास उपस्थित राहतील तिथे शाब्दिक कोटयांतून हशा पिकल्याशिवाय राहत नाही. भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांच्या मंदिर कार्यक्रमास कार्यक्रमास माजी खासदार नाना नवले आणि श्रीविनास पाटील उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख भाषण झाल्यावर श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘जे ज्याचं नाही, ते माझे म्हणण्याची प्रवृत्ती वाढत आहे. इंथे खूप मोठे धार्मिक कार्य होत आहे. मी कलेक्टर होतो. त्यावेळी मी विविध कामे केली. आता वेगळं काम माझ्याकडे आले आहे. आता वर्गणी कलेक्ट करण्याचे काम माझ्याकडे आली आहे. वर्गणी कलेक्टर झालो आहे.’’ या शाब्दिक कोटीवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. पैलवानाचे कपडे सांभाळायला, शरदराव आणि मी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी खासदार नाना नवले आणि विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. याबाबतचा किस्सा श्रीनिवास पाटील यांना सांगितला. भंडारा डोंगरावरील मंदिर संकल्प सभेत श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘‘इंथ आल्यावर सर्व मित्र भेटल्याने जुण्या आठवणींना उजाळा मिळाला. नाना पैलवान. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो की तो कुस्ती करायचा. मी आणि शरदराव त्यांचे कपडे सांभाळायचो.’’ यावेळी हशा पिकला. या कोटींनंतर नवले मनोगत व्यक्त करायला लागले. त्यावेळी त्यांचा माईकला पाटील यांनी हात लावला. त्यावर ते म्हणाले, ‘‘बघा हे मित्र. मला कुस्तीच्या आखाड्यात पाठवायचे. हाडं काडं मोडायला पाठवून गंमत पाहायचे.’’ त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मदतीचा पाऊस विशेष संकल्प सभेत एमआयटीचे प्रमुख कराड यांनी दहा हजार कर्मचार्‍यांचेएक दिवसांचे वेतन देण्याचे जाहीर केले. तर माजी राज्यपाल पाटील यांनी एक महिन्याचे पेन्शन, माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी भारती विद्यापीठातील कर्मचाजयांचे एक दिवसांचे वेतन देण्याचे जाहिर केले. उल्हास पवार यांनी एक महिन्याची पेन्शन, माजी आमदार कदम यांनी एक वर्षांचे वेतन दिले. माजी आमदार बापू पठारे यांनी वर्षाचे पेन्शन दिले. तसेच राहुल कलाटे यांनी 11 लाखांची देणगी दिली. त्यानंतर सामान्य वारकजयांनी एक रूपयापासून एक कोटींपर्यंतची मदत जाहिर केली. कराळे पाटील यांनी मंदिरास जागा दिली. मदतीचा पाऊस पडला. नाना शिवले यांनी सूत्र संचालन केले. माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी आभार मानले.
भंडारा डोंगरावरील तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा : श्रीनिवास पाटील भंडारा डोंगरावरील तुकोबारायांच्या मंदिरासाठी हातभार लावावा  : श्रीनिवास पाटील Reviewed by ANN news network on ९/१८/२०२२ ०७:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".