भोसरीतील गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिची काला नाग पर्वतावर चढाई
भोसरी : गिर्यारोहकांच्या चढाईसाठी नावाप्रमाणेच अजस्त्र उत्तराखंडमधील काला नाग ( ब्लॅक पीक ) पर्वतावर चढाई करण्याचा पराक्रम पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी केला. यामध्ये भोसरीतील बाल गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिचा समावेश आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील गिर्यारोहकांनी उत्तराखंड येथील 6387 मी उंचीच्या शिखरावर 6 010 मीटरपर्यंत यशस्वी चढाई केली. बंदरपूंछ पर्वतरांगेतील अतिदूर्गम व अजस्त्र असा ब्लॅक पीक (काला नाग) पर्वत आणि त्यावर असणार्या हिमभेगा, चढाईसाठी 75-80 अंश कोनात असणारा तीव्र चढ आणि उणे 15-20 अंश सेल्सियस असणारे तापमान यामुळे चढाईसाठी अतिकठीण मानला जातो. या शिखरावर चढाईची मोहीम दि.26 अॅागस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान आखली होती.
यामध्ये एकूण 8 गिर्यारोहकांचा सहभाग होता. वय वर्षे 13 पासून ते वय वर्षे 51 पर्यंतचे गिर्यारोहक या मोहिमेत सहभागी झाले . यामध्ये कु. गिरीजा धनंजय लांडगे (13 वर्षे ), धनंजय सयाजी लांडगे, गोपाल भिमय्या भंडारी, ओंकार सुभाष पडवळ, शालिनी शर्मा, निखिल किसन कोकाटे, सुनिल पिसाळ (51 वर्षे ), विश्वजीत पिसाळ ( 50 वर्षे ) यांनी सहभाग घेतला. एकूण 15 दिवसांची मोहीम होती.
गिर्यारोहक धनंजय लांडगे म्हणाले की, सुरुवातीचे 2 दिवस पुणे ते देहरादून रेल्वे प्रवास करून आमची टीम देहरादून येथे पोहोचली, ही मोहीम सेमी अल्पाईन पद्धतीची असल्याने सोबत असलेले तांत्रिक साहित्य वगळता मोहीमेसाठी लागणारे सर्व किराणा , भाजीपाला साहित्य बाजारातून गोळा करून लोकल गाईडच्या साह्य्याने टिमने पुढील प्रवासाला सुरूवात केली. सांक्री ते तालूका या गावांदरम्यानचा गाडीप्रवास चालू असताना तीन ठिकाणी भूस्खलन सारख्या नैसर्गिक संकटावर मात करत पुढे जावे लागले. सेमी अल्पाईन पद्धत असल्याने मोहीमेसाठी लागणारे साहित्य जवळजवळ प्रत्येकी 25 किलो वजन घेऊन तालूका - गंगाड - सीमा - रुईनसारा लेक - क्यारकोटी बेस कँप - अॅडव्हान्स कँप पर्यंत रोज सरासरी 9-10 किमी पायी ट्रेक करत व रोज 500-700 मीटर पर्यंत उंची गाठत सर्वजण कँप पर्यंत पोहोचले. दरम्यान, जाताना टीमला भूस्खलनसारख्या नैसर्गिक अडचणीला सामोरे जावे लागले . बेस कँप पर्यंत पोहोचण्यासाठी आलेल्या अनेक अडचणींवर मात करत , अगदी टिमने बेस कँप ते समिट कँप पर्यंत भूस्खलन (ङरपव डश्रळवश) ने पूर्णपणे बंद झालेल्या रस्त्यांवर स्वतः रस्ता तयार करत , नैसर्गिक अडचणींवर मात करत समीट कॅम्प गाठला.
लेक वाचवा , लेक जगवा , लेक वाढवा’’चा संदेश
महाराष्ट्रातील पहिली टीम कि ज्या टिमने कालानाग ( ब्लॅक पीक) पर्वतावर 6010मी. पर्यंत यशस्वी चढाई करून तिरंगा ध्वज फडकावत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तसेच, लेक वाचवा , लेक जगवा , लेक वाढवा’’चा संदेश देण्यात आला. या मोहीमेत रोज सकाळ संध्याकाळ गणरायाची आरती करून गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या गिर्यारोहण मोहीमेस दूर्गप्रेमी गिरीभ्रमण संस्था , सह्याद्री रोव्हर्स , ध्यास सह्याद्री , शिवदुर्ग मित्र लोणावळा ,महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, अॅडव्हेंचर डायरीज , डव्हेंचर मंत्रा , माऊंटेन स्पोर्टस कॅडमी या संस्थांचे मोलाचे सहकार्य मिळाले. या संस्थांच्या सहकार्याने पहिल्यांदाच अशी मोहीम संयुक्तिक पणे राबवण्यात आली, अशी माहिती गिर्यारोहक धनंजय लांडगे यांनी दिली.
भोसरीतील गिर्यारोहक गिरीजा लांडगे हिची काला नाग पर्वतावर चढाई
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२२ १०:२७:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/१७/२०२२ १०:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: