पिंपरी : मावळातील संत तुकारामचा सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ दि. ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन होणार आहे.
या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले व सर्व संचालक मंडळाने केले आहे.
कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद शेतकèयांना मागील वर्षाप्रमाणे दिपावली निमित्त २० रुपये प्रतिकिलो दराने गटनिहाय साखर वाटप केले जाणार आहे. कारखान्याच्या प्रक्षेत्रावर सुट्टीचे दिवस वगळून १० ते २१ ऑक्टोबर पर्यंत तसेच कारखाना गट घोटावडे व तळेगांव दाभाडे येथे ३ व ४ ऑक्टोबर, पौड व इंदोरी येथे ६ व ७ ऑक्टोबर, कोळवण व धायरी येथे ८ ऑक्टोबर, मुठा व कामशेत येथे १० व ११ ऑक्टोबर, पवनानगर (कडधे ऑफिस) व देहूगांव येथे १२ व १३ ऑक्टोबर, लोणावळा व दोंदे (चांदोली ऑफिस) येथे १४ ऑक्टोबर, चाकण येथे १५ ऑक्टोर, शेलपिंपळगांव १५ व १७ ऑक्टोबर, मरकळ येथे १७ व १८ ऑक्टोबर, कोरेगांव भीमा येथे १८ व १९ ऑक्टोबर रोजी साखर वाटप सुरू राहणार आहे. सभासदांनी येताना आपले साखर वाटप स्मार्टकार्ड घेऊन यावे.
ज्यांना साखर वाटप स्मार्ट कार्ड मिळाले नाही किंवा ज्यांचे कार्ड हरवले असेल त्यांनी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी सभासदाचे व कार्डघेणाराचे मूळ आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स यापैकी एक मूळ पुरावा दाखवून कारखाना साईटवरून स्मार्टकार्ड घेऊन जावे अशी माहिती कार्यकारी संचालक एस.जी.पठारे यांनी दिली.
मंगळवारी संत तुकाराम साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन समारंभ
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ०८:५५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/३०/२०२२ ०८:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: