शहाजीबापूंच्या ’डायलॉग’ची शेलारवाडी परिसरात चर्चा
वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील शेलारवाडी परिसरात शिवसेनेचे सांगोला येथील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा ’काय झाडी...काय डोंगार...काय हाटील....’ हा सर्वत्र प्रसिद्ध झालेला डायलॉग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
शेलारवाडीतील सतीश भेगडे यांनी त्यांच्या घरात गणपतीची सजावट केली आहे. त्यामध्ये यावर आधारित देखावा तयार केला आहे. गणेशमूर्तीच्या बाजूला उंच डोंगर, झाडी आणि गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेल दाखविण्यात आले असून ’आय लव्ह गुवाहाटी’ हे घोषवाक्य ही तिथे लिहून ठेवण्यात आले आहे. या सजावटीमुळे आमदार शहाजी बापू पाटील यांचा हा प्रचंड गाजलेला डायलॉग शेलारवाडी परिसरात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
शहाजीबापूंच्या ’डायलॉग’ची शेलारवाडी परिसरात चर्चा
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०४:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/०३/२०२२ ०४:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: