भोसरीत मृत गुरांची उघड्यावर विल्हेवाट

भोसरी : भोसरी परिसरात गोवंशातील मृत्यू झालेली जनावरे उघड्यावर टाकण्याचा प्रकार उघडकीस आला असून शहरातील मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी नेमण्यात आलेला ठेकेदार हे काम नीट करत नसल्याचे दिसून आले आहे. भोसरी, बालनगरी परिसरात मृत जनावरे उघड्यावर टाकण्यात आली असून त्यामुळ्रे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.तेथील नागरिकांना याचा त्रास होत आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी शहरातील मृत जनावरे पुरविण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले आहे. त्यांनी काम व्यवस्थित केले नाही.पावसामुळे माती वाहून गेली. त्यामुळे पुरलेली जनावरे उघडी पडली आहेत. याबाबत एजन्सीला नोटीस दिली आहे. मृत जनावरे व्यवस्थित पुरण्याचे आदेश दिले आहेत. असे तकलादू स्पष्टीकरण देत मृत जनावरे पुरून त्याची छायाचित्रे पाठविण्याची सूचना एजन्सीला केली आहे अशी सारवासारव केली.
भोसरीत मृत गुरांची उघड्यावर विल्हेवाट भोसरीत मृत गुरांची उघड्यावर विल्हेवाट Reviewed by ANN news network on ९/२३/२०२२ ०९:०१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".