स्थायी, सर्वसाधारण सभेसाठी प्रस्ताव ठराविक मसुद्यातच सादर करावे लागणार! : मनमानी कारभाराला आळा घालण्याचा आयुक्तांचा प्रयत्न
पिंपरी : महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सूसूत्रता नसल्यामुळे अनेकदा अडचणी उद्भवतात. महापालिकेत अनेक वर्षे एकाच खुर्चीत बसून तेथील कारभारात पक्के मुरलेले अधिकारी कित्येकदा तीन वर्षांच्या मुदतीसाठी आलेल्या आयुक्तांनाही दाद देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. स्थायीसमिती आणि सर्वसाधारण सभेसमोर मोघम, अपुरी माहिती सादर करून प्रस्ताव मंजूर करून घ्यायचे आणि नंतर मनमानी करायची असे प्रकार पालिकेत सर्रास सुरू असलेले दिसतात. आयुक्तांनी या प्रकाराला आता आळा घालण्याचे ठरविले आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती, सर्वसाधरण समितीकडे मान्यतेसाठी आलेले आणि अर्धवट माहिती असलेले 8 विषय बाजूला ठेवले. सविस्तर माहितीसह फेरसादर करण्याचे आदेश दिले.
त्यांच्या सूचनेनुसार नगरसचिव विभागाने प्रस्तावांचा नमुना मसुदा तयार केला असून तो पालिकेच्या सर्व विभागांना पाठविला आहे. त्या मसुद्याबरहुकूम सर्व प्रस्ताव असणे आवश्यक आहे. मसुद्याप्रमाणे नसतील ते प्रस्ताव नगरसचिव विभागाकडून स्वीकारले जाणार नाहीत असे अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप यांनी परिपत्रकाद्वारे विभागप्रमुखांना कळविले आहे.
स्थायी, सर्वसाधारण सभेसाठी प्रस्ताव ठराविक मसुद्यातच सादर करावे लागणार! : मनमानी कारभाराला आळा घालण्याचा आयुक्तांचा प्रयत्न
Reviewed by ANN
on
९/२९/२०२२ ११:२४:०० PM
Rating:
Reviewed by ANN
on
९/२९/२०२२ ११:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: