पिंपरी : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
भालकर यांची राज्यसरकारने बदली करून तीन महिने झाले तरी ते बदलीच्या ठिकाणी रूजू होत नाहीत. याची सरकारने गंभीर दखल घेऊन त्यांना स्मार्ट सिटीच्या कारभारातून कार्यमुक्त करावे, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामे चांगली व्हावी म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा दिला. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरु झाली. पालिका प्रशासन अधिकारी आणि स्मार्ट सिटी अधिकारी यांनी खासगी ठेकेदारांना हाताशी धरून विकास कामे मिळवून कोट्यावधी रुपयांची दलाली मिळविली. भूमीगत केबल, सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे या कामांमध्ये स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी लाखो रुपयांची दलाली मिळविली आहे, असा आरोप काळभोर यांनी निवेदनात केला आहे. यासंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी अशोक भालकर यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
भालकर यांना बढती मिळाली असूनही ते स्मार्ट सिटीमधून जात नाहीत. या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुराव्यासहित तक्रार करणार असल्याचे काळभोर यांनी म्हटले आहे.
अशोक भालकर यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी : सचिन काळभोर
Reviewed by ANN
on
९/२९/२०२२ १०:५९:०० PM
Rating:
Reviewed by ANN
on
९/२९/२०२२ १०:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: