महाराष्ट्रात मिया बाय तनिष्कचे १४ वे एक्सक्लुसिव्ह बुटीक
पिंपरी : भारतातील एक सर्वात फॅशनेबल ज्वेलरी ब्रँड मिया बाय तनिष्कने आपला महत्त्वाकांक्षी रिटेल विस्तार कायम राखत पुण्यामध्ये पिंपरी येथे नवे स्टोर सुरु केले आहे. दुकान क्रमांक १०१, तळमजला, गेरा इम्पेरियम ओयासिस, सर्व्हे नंबर ३५, तनिष्क ज्वेलरी शॉपच्या बाजूला, मोरेवाडी, पिंपरी, पुणे - ४११०१८ याठिकाणी हे मिया बाय तनिष्कचे नवे स्टोर आहे. टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सीके वेंकटरमण यांनी या स्टोरचे उद्घाटन केले. नवीन स्टोरच्या शुभारंभाच्या निमित्ताने मिया बाय तनिष्कने मिया उत्पादनांवर २०% पर्यंतची आकर्षक सूट* देखील जाहीर केली आहे. २७ ते २९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत या ऑफरचा लाभ घेता येईल.
पुण्यामध्ये मिया बाय तनिष्कचे हे चौथे स्टोर तब्बल ७०० चौरस फुटांचे आहे. १४ व १८ कॅरेट सोन्यामध्ये घडवलेले विविध डिझाइन्सचे दागिने याठिकाणी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत. उठावदार रंगीत स्टोन्स, आकर्षक सोने, अद्वितीय चमक असलेले हिरे आणि पाहताक्षणी नजरेत भरणारी चांदी - असे वेगवेगळे मिया बाय तनिष्कचे अतिशय सुंदर दागिने या स्टोरमध्ये आहेत. याठिकाणी कानातले, अंगठ्या, पेंडंट, नेकलेस, बांगड्या व ब्रेसलेट्स असे अनेक प्रकार याठिकाणी खरेदी करता येतील. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक प्रसंगाला साजेसे, प्रत्येक ग्राहकाची आवडनिवड पूर्ण करतील असे दागिने मिया बाय तनिष्कमध्ये उपलब्ध आहेत.
टायटन कंपनी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सीके वेंकटरमण यांनी यावेळी सांगितले, "पुण्यामध्ये आमचे अजून एक स्टॅन्डअलोन स्टोर सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आज देशभरातील स्त्रियांच्या स्वतःच्या खास आवडीनिवडी आणि स्टाईल्स आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे दागिने मिया बाय तनिष्कने प्रस्तुत केले आहेत. अनोख्या, मिनिमल व सुबक डिझाइन्समुळे हे दागिने आजच्या स्त्रीच्या स्टाईल कोशंटला साजेसे ठरतात. आमच्या ग्राहकांना ट्रेंडी उत्पादने व दागिने खरेदीचा अतुलनीय अनुभव प्रदान करण्याची आमची परंपरा अशीच पुढे कायम राखली जाईल."
मिया बाय तनिष्क
तनिष्कची परंपरा व वारसा ज्याचा मूळ आधार आहे असा हा मिया ब्रँड आधुनिक, आकर्षक, अनोखे दागिन्यांसाठी नावाजला जातो. यातील डिझाइन्स अतिशय आगळीवेगळी, नाजूक परंतु अनोखी व अतिशय बहुउपयोगी आहेत. मियामध्ये अशा अनेक कलेक्शन्सची विशाल श्रेणी आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक प्रसंगासाठी साजेसे दागिने मिळतात. मिया बाय तनिष्कच्या किमती २९९९ रुपयांपासून सुरु होतात. १८ व १४ कॅरेट सोन्यात घडवलेल्या या दागिन्यांच्या १५०० पेक्षा जास्त डिझाइन्स आहेत व देशातील सर्व तनिष्क स्टोर्समध्ये ती उपलब्ध आहेत. मिया बाय तनिष्कच्या रिटेल नेटवर्कमध्ये ७५ स्टॅन्डअलोन स्टोअर्स आहेत, त्याचबरोबरीने मोठ्या तनिष्क स्टोर्समध्ये देखील हा ब्रँड उपलब्ध आहे. https://www.miabytanishq.com/ या होम पेजबरोबरीनेच सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर हा ब्रँड उपलब्ध आहे - https://www.amazon.com/ , https://www.tatacliq.com/
मिया बाय तनिष्कने पिंपरीमध्ये सुरु केले नवे स्टोर
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२२ ०३:४५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२२ ०३:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: