वडगाव मावळ : वेदांता फाॅक्सकाॅन हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा याठिकाणी महाविकास आघाडी सरकारने मोठा पाठपुरावा केला. आमचे सरकार असते तर हा प्रकल्प आम्ही जाऊ दिला नसता. मात्र खोके सरकारने सत्तेत येताच दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घालत लाखो युवकांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला घालवला, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी केली.वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजराथला गेल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथे झालेल्या जनआक्रोश मोर्चासमोर ते बोलत होते. मोर्चात हजारोंच्या संख्येने युबक तसेच शिवसेना, युवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्राला आश्वासनांचे गाजर नको रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत आहोत. राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर हलवले गेल्याने दोन लाख रोजगार हिरावले गेले आहेत. ही घटना दुसऱ्या राज्यात घडली असती तर उद्योगमंत्री यांनी राजीनामा दिला असता अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. आदित्य ठाकरेपुढे म्हणाले, आजचा आक्रोश मोर्चा हा सर्वसामान्य तरुणाचा आवाज आहे. राज्यातील आणि मावळातील तरुतरुणांमध्ये सरकार बाबत राग आणि आक्रोश आहे. महविकास आघाडी सरकार असते तर वेदांत प्रकल्प मावळमध्ये आला असता आणि त्याचा जल्लोष आपण साजरा केला असता. मावळातील या प्रकल्पासह रोहा येथे व संभाजीनगर येथे होणारे प्रकल्प देखील केंद्र सरकारने दुसर्या राज्यांमध्ये पळविले. या दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रत्येकी 70 ते 80 हजार रोजगार देण्याची क्षमता होती. वरळी भागात एका सी लिंकचे काम होणार आहे त्याचे इंटरव्ह्यू चेन्नईत झाले. कारण सांगितले की महाराष्ट्रात 1700 इंटरव्ह्यू झाले पण कामासाठी आवश्यक असणारे कोणी भेटले नाही. ही महाराष्ट्राची कुचेष्टा आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपनीला याचा जाब विचारत इंटरव्ह्यू महाराष्ट्रातच झाला पाहिजे असे ठणकावून सांगितले पाहिजे असेही ते म्हणाले.
दिल्लीश्वरांपुढे लोटांगण घालत वेदांता प्रकल्प गुजरातला घालवला : आदित्य ठाकरे
Reviewed by ANN news network
on
९/२४/२०२२ ०९:२०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: