प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघातील राज्य सरकारशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. तसेच, भूसंपादनाचे सात प्रस्ताव प्राधान्याने येत्या महिनाभरात मंजूर करावे, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत पुण्यात बैठक घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्राधान्याने भूसंपादनाचे सात प्रस्ताव तातडीने येत्या महिन्याभरात मार्गी लावावे. त्यासाठी भूसंपादन विभाग, नगर रचना विभाग आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका भूमि अभिलेख विभाग यांनी समन्वय साधून तातडीने प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. आमदार लांडगे म्हणाले की, सफारी पार्क, मोशी येथील जागा पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी लवकरात-लवकर जागा मागणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. जागा हस्तांतरण करून, पुढील कार्यवाही करावी. तसेच, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यावर वाहतुकीचा ताण असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘डीपी रस्ता’ व ‘पीएमआरडीए’ हद्दीतील जागेबाबत संयुक्त स्वतंत्र बैठक आयोजित करावी. ज्यामुळे मुख्य रस्त्याला समांतर रस्ता होऊन वाहतुकीचा ताण कमी करण्यात मदत होईल, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा Reviewed by ANN news network on ९/२०/२०२२ ०५:३७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".