पवना संकुलातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश

पवना संकुलातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश पवनानगर: पवना संकुलातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय आंतरशालेय बौद्धिक स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या या स्पर्धेत मावळ तालुक्यातील विविध शाळांमधील 277 विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये सर्वाधिक 9 बक्षिसे पवना संकुलातील विद्यार्थ्यांना मिळाली. या तालुकास्तरीय स्पर्धेत बौद्धिक क्षमता चाचणी, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पद्य पाठांतर स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होण्यास पात्र होते. स्पर्धेत यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना संकुलाच्या मुख्याध्यापिका अंजली दौंडे, पर्यवेक्षिका नीला केसकर, रोशनी मराडे, सुवर्णा काळडोके, वैशाली वराडे, सुनील बोरुडे, गणेश ठोंबरे, गणेश साठे, मोहन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे यांनी अभिनंदन केले आहे.
पवना संकुलातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश पवना संकुलातील विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश Reviewed by ANN news network on ९/०३/२०२२ ०४:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".