वाकड येथे सराईत गुन्हेगार अटकेत

वाकड येथे सराईत गुन्हेगार अटकेत वाकड : कस्पटेवस्ती, वाकड येथे राहणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शस्त्र विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक काडतूस असा पंचवीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल केला आहे. ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (रा. मारुती कस्पटे इमारत, शिवतांडव कॉलनी, कस्पटेवस्ती, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रीतम वाघ यांना मिळाली. त्यानंतर सहाय्यक पोलीस फौजदार श्याम शिंदे, एन. के. वावळे यांनी कर्मचार्‍यांच्या सहाय्याने आरोपीच्या निवासस्थानी छापा मारला असता एक गावठी पिस्तूल आणि एक काडतूस पोलिसांना मिळाले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाकड येथे सराईत गुन्हेगार अटकेत वाकड येथे सराईत गुन्हेगार अटकेत Reviewed by ANN news network on ८/२७/२०२२ १०:०६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".