शहर भाजपला आणखी एक धक्का!

नगरसेवक रवि लांडगे यांचा पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या एकनिष्ठ लांडगे घराण्यातील नगरसेवक रवि लांडगे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. रविवारी विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस पिंपरी चिंचवडमध्ये आणि पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये येत आहेत. नेमका त्याचवेळेस लांडगे यांनी राजीनामा दिल्यामुळे याचे पडसाद भाजपमध्ये स्थानिक पातळीवर उमटण्याची शक्यता आहे. रवि लांडगे यांनी म्हटले आहे की, माझे वडील दिवंगत बाबासाहेब लांडगे आणि चुलते दिवंगत अंकुशराव लांडगे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजप रूजवण्यासाठी फार कष्ट घेतले आहेत. त्यांचे हे कष्ट मी लहानपणी जवळून पाहिले आहेत. तेव्हापासूनच माझ्यावर भाजपचे संस्कार रुजले. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा राजकीय जन्म हा भाजपमधूनच झालेला आहे. मी पक्षात सक्रिय झाल्यापासून पूर्ण समर्पणाने काम केले. पक्षाशी कधी गद्दारी केली नाही. भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षवाढीसाठी पूर्ण ताकदीने काम केले. पक्षाच्या जुन्या निष्ठावंतांना ताकद देण्याबरोबरच नवीन कार्यकर्त्यांनाही सोबत घेतले. पक्षहित लक्षात घेऊन नवीन आणि जुना असा कधीच भेदभाव केला नाही. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून 2017 च्या महापालिका निवडणुकीत भोसरीतील धावडेवस्ती प्रभागातून बिनविरोध निवडून आलो. या पदाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघर्ष केला. यापुढेही करत राहणार आहे. पण लोकांना न्याय देत असताना पक्ष म्हणून खंबीरपणे साथीची गरज असते, तीच मिळत नसेल तर पक्षात राहून उपयोग नाही. महापालिकेच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या प्रत्येक विकासकामांत भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचारच झालेला आहे. प्रत्येक कामांत रिंग करून पक्षविरोधी काम करणार्यांरना बळ दिले गेले आहे. चिखलीतील संतपीठ असो की नदी सुधार प्रकल्प असो की भोसरी उड्डाणपुलाखाली अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रकल्प असो की कचरा डेपोवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प असो एकही काम असे नाही की जे भ्रष्टाचाराविना राबवण्यात आले आहे. भाजपला भ्रष्टाचाराची ही सर्व देणगी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी दिलेली आहे. महेश लांडगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून पक्षाची प्रतिमा भ्रष्टाचारी पक्ष असा झाली आहे. पक्षाची अशी प्रतिमा मलिन झालेली पाहून माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला फक्त त्याकडे बघत राहणे शक्य होत नाही. मी पक्षात राहूनही अनेकदा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून होणार्याह भ्रष्टाचाराला कडाडून विरोध केलेला आहे. भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी मला पक्षाच्या निर्णयाविरोधातच रस्त्यावरची लढाई लढावी लागली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या सत्ताकाळात स्थायी समितीच्या सभापतीला लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली ही पक्षाला नाचक्की आणणारी घटना घडली. त्यावरून भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांमध्ये किती भ्रष्टाचार बोकाळला आहे, हे स्पष्ट होते. त्यामुळे आता पक्षात माझा राजकीय श्वास गुदमरतो आहे.त्याामुळे मी भारतीय जनता पार्टीतील माझ्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देत आहे.
शहर भाजपला आणखी एक धक्का! शहर भाजपला आणखी एक धक्का! Reviewed by ANN news network on ३/०५/२०२२ ११:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".