आज भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

पिंपरी : भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 5 वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी क्रीडाप्रेमी आणि कुस्तीशौकिनांनी उपस्थित रहावे असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष अॅिड. नितीन लांडगे यांनी केले आहे. भोसरी सर्व्हे क्रमांक एक येथे गावजत्रा मैदानाशेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे भव्यदिव्य देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापूर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष,आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी 8 हजार 600 चौरस मीटरच्या जागेत 5 हजार 511 चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि 500 व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, 50 व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह 12 चौरस मीटरच्या दोन मॅट, 1 हजार 200 प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून ज्येष्ठ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली युवा पैलवानांना सराव करता येईल यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल घडतील असा विश्वास नितीन लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
आज भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आज भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन Reviewed by ANN news network on ३/०५/२०२२ ११:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".