पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी खासदार गजानन बाबर यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत पवार म्हणाले गजानन बाबर यांनी या शहरात केलेले काम तसेच वाई येथील किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून केलेले काम कोणीही विसरू शकत नाही. नुकताच गजानन लोकसेवा सहकारी बँकेचा वर्धापन दिन पार पडला. त्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्या कर्यक्रमाच्या आठवणीही पवार यांनी जागविल्या.
यावेळी मधुकर बाबर, प्रकाश बाबर, योगेश बाबर, धीरज बाबर, सुरज बाबर, अमित बाबत, सुमित बाबर यांच्यासह शिवसेनेचे महापालिकेतील गटनेता राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, उद्योजक दिलीप देशमुख उपस्थित होते.
अजित पवार यांनी केले बाबर कुटुंबियांचे सांत्वन
Reviewed by ANN news network
on
२/०५/२०२२ १०:५२:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: