खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांना अटक

न्यायालयाने दिली चार दिवस पोलीसकोठडी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक, माजी उपमहापौर केशव घोळवे यांच्यासह अन्य चौघांना पिंपरी पोलिसांनी बुधवारी अटक केली. मोहम्मद तय्यब अली शेख (वय ४५, रा. पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुड्डू उर्फ प्रमोद यादव, घनशाम यादव, मलका यादव, केशव घोळवे, हसरत अली शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इतर व्यापारी नेपाळी मार्केट येथे कपड्याचा व्यापार करतात. त्यांची जागा मेट्रोच्या प्रकल्पात जाणार आहे. तिला पर्याय म्हणून शासनाकडून फिर्यादी आणि इतर व्यापा-यांना १०० गाळे कायदेशीर मिळणार आहेत. असे असताना आरोपींनी आपसात संगनमत करून सन २०१९ ते आज पर्यंत फिर्यादी व इतर व्यापा-यांना महापालिकेकडून गाळे मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्यापोटी भाजपा कामगार आघाडी,महाराष्ट्र प्रदेश या संस्थेमध्ये दरवर्षी बाराशे रुपयांची पावती करायला भाग पाडले. त्यातून फिर्यादी आणि इतर व्यापा-यांची फसवणूक केली. शासनाकडून गाळे मिळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून ५५ हजार रुपयांची खंडणी घेतली. त्यानंतर देखील १ लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादी यांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. घोळवे यांच्यासह अटक करण्यात आलेल्या आरोपींना बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीसकोठडी सुनावली. या प्रकारामुळे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. महापालिका निवडणुकीत घोळवे मोरवाडी, संभाजीनगर प्रभागातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. भाजपने त्यांना उपमहापौरही केले होते. कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थक अशी ओळख आहे. कामगार नेते म्हणूनही ते परिचित आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे समर्थक अशी घोळवे यांची ओळख आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला : संजोग वाघेरे
घोळवे यांच्या अटकेनंतर दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसने या विषयावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपचा खरा चेहरा आता जनतेसमोर यायला लागला आहे अशा शब्दात पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली. या पत्रकार परिषदेला विरोधीपक्ष नेता राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा, नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेवक डब्बू आसवानी, प्रवक्ता फजल शेख उपस्थित होते यावेळी बोलताना डब्बू आसवानी यांनी सांगितले की, आपल्या नावाने काही लोक पैसे गोळा करत असल्याचे आपल्या कानावर आले. या प्रकारामुळे आपणाला धक्काच बसला. त्यामुळे आपण तात्काळ पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे लेखी तक्रार दिली. या प्रकरणाची पोलीस शहानिशा करत असतानाच मोहम्मद तय्यब अली शेख या विक्रेत्याने पोलिसात तक्रार दिली. त्यात चौकशीअंती या प्रकरणाशी घोळवे यांचा संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांच्यासह अन्य चौघांना अटक केली आहे.
खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांना अटक खंडणी प्रकरणी भाजप नगरसेवक केशव घोळवे यांना अटक Reviewed by ANN news network on २/०२/२०२२ १०:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".