गजानन चिंचवडे यांचे निधन

चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांचे शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते 52 वर्षांचे होते. त्याच्या पश्चात पत्नी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि दोन मुले असा परिवार आहे. शनिवारी सकाळी आंघोळीसाठी बाथरुमध्ये गेले असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते कोसळून पडले. त्यांना तातडीने लोकमान्य रग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. चिंचवड गावातील धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. चिंचवडे यांनी प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या संपर्कात आल्यानंतर काँग्रेसमधून आपला राजकीय प्रवास सुरु केला. पीसीएमटी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य झाले. खासदार श्रीरंग बारणे यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर जिल्हाप्रमुख म्हणून मोठी जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत चिंचवडगाव येथून निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू होती.
गजानन चिंचवडे यांचे निधन गजानन चिंचवडे यांचे निधन Reviewed by ANN news network on २/०५/२०२२ १०:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".