सत्ताधा-यांच्या दबावाखाली येऊन आयुक्तांनी प्रभागांचे लचके तोडले! सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांचा आरोप
पिंपरी : पालिकेच्या झालेल्या प्रभाग रचनेत आयुक्तांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली येऊन अनेक प्रभागांचे लचके तोडले असल्याचा आरोप सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. पालिकेचे मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमध्ये येत्या पालिका निवडणुकीसाठीचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. याबाबत ढाके प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की पालिकेच्या निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना योग्यपद्धतीने न करता अनेक प्रभागांचे लचके तोडण्यात आले आहेत. हे काम राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या दबावाखाली येऊन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.असे असले तरी शहरातील मतदारांच्या मनात भाजपने केलेली विकासकामे आहेत त्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही या निवडणुकीत भाजप 'अब के बार सौ पार' होणार आहे.
सत्ताधा-यांच्या दबावाखाली येऊन आयुक्तांनी प्रभागांचे लचके तोडले! सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांचा आरोप
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२२ १०:४४:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: