पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभागरचना शिवसेनेला फायद्याचीच ठरण्याची शक्यता पिंपरी चिंचवड शहर शिवसेना प्रमुख अॅड. सचीन भोसले यांनी व्यक्त केली.
ही प्रभाग रचना शिवसेनेला लाभदायक ठरणार आहे व शिवसेना नक्कीच अगामी निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळविल्याशिवाय राहणार नाही असे अॅड. भोसले यांनी म्हटले आहे
ते म्हणाले की, १०० टक्के शिवसेनेच्या हिताची प्रभाग रचना आहे.
आगामी निवडणुकीत आघाडी करण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील परंतु स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली तरी ३० पेक्षा जास्त शिवसेना नगरसेवक सभागृहात दिसतील.
जर आघाडी असेल तर यापेक्षाही चांगले यश शिवसेनेला मिळाल्याशिवाय राहणार नाही.
शंभर टक्के शिवसेनेच्या हिताची प्रभागरचना!; अॅड्. सचिन भोसले यांचे मत
Reviewed by ANN news network
on
२/०१/२०२२ १०:५०:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: