पिंपरी : काँग्रेस पक्ष महिलांना जागृत, सक्षम आणि शक्तिशाली बनविणारा देशातील एकमेव पक्ष आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या प्रभारी सोनल पटेल यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी आकुर्डी, प्राधिकरण येथिल केरळ भवन येथे आयोजित केलेल्या ‘परिवर्तन 2022’ या महिला प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी शहराध्यक्ष कैलास कदम, महिला शहराध्यक्षा सायली नढे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी, युवक अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, निर्मला कदम, निगार बारसकर, विश्वास गजरमल, छाया देसले, डॉ. मनिषा गरुड, स्वाती शिंदे, भारती घाग, सुप्रिया पोहारे, सोनू दमवाणी, राजश्री बनसोडे, राणी राठोड तसेच मार्गदर्शक यशराज पारखी आणि ऋत्विक जोशी आदींसह प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधताना सोनल पटेल म्हणाल्या की, स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत महिलांना समाजकार्यात आणि राजकारणात समान संधी मिळवून देणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष आहे.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले की, आगामी काळात होणार्या मनपा निवडणूकीत जवळपास सत्तर जागांवर महिलांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून या शिबाराचे आयोजन केले आहे.
शिबीराच्या सुरुवातीला ज्येष्ठ उद्योगपती माजी खा. राहुल कुमार बजाज यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
स्वागत सायली नढे यांनी केले. सूुत्रसंचालन सोनू दमवाणी, सुप्रिया पोहारे यांनी केले. आणि आभार छाया देसले यांनी मानले.
महिलांना सक्षम, शक्तिशाली बनविणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष : सोनल पटेल
Reviewed by ANN
on
२/१३/२०२२ १०:०९:०० PM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: