माजी खासदार गजानन बाबर यांचे देहावसान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले पहिले खासदार गजानन बाबर यांचे बुधवारी दुपारी बाणेर येथील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर चिंचवड येथील निरामय रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु दोनच दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. तथापि त्यांची प्रकृती अधिक खालावली. बुधवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बाबर मुळचे किकली, ता. वाई येथील होते. पिंपरी चिंचवड शहरातील काळभोरनगर परिसरातूने ते तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दोन वेळा ते हवेली मतदारसंघातून आमदार झाले आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे ते सध्या उपाध्यक्ष होते. तसेच ते रेशन दुकानदारांच्या फेडरेशनचे अध्यक्ष होते. गजानन लोकसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. २०१४ मध्ये शिवसेनेने बाबर यांना लोकसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. २०१७ मध्ये ते भाजपमध्ये गेले. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बंधू माजी नगरसेवक प्रकाश बाबर, मधुकर बाबर, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माजी खासदार गजानन बाबर यांचे देहावसान माजी खासदार गजानन बाबर यांचे देहावसान Reviewed by ANN news network on २/०२/२०२२ १०:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".