आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सांगवी ते बोपोडी पुलाचे भूमिपूजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने प्रभाग क्रमांक ३२ मध्ये सांगवी बोपोडी दरम्यान मुळा नदीवर बांधण्यात येणाèया पुलाच्या कामाचे भूूुमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते मंगळवारी झाले. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या शारदा सोनवणे, सीमा चौगुले, नगरसदस्य संतोष कांबळे, हर्षल ढोरे, पोपट जम, अतुल शितोळे, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापू गायकवाड यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पुलाबद्दल माहिती सांगताना महापौर माई ढोरे यांनी सांगितले की, ब्रेमन चौक, औंध तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाकडे जाण्यासाठी सांगवीतील नागरिकांना सध्याच्या स्पायसर कॉलेज पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. सांगवीतील नागरिकांना बोपोडी, दापोडी,खडकीकडे तसेच पुणे शहराकडे जाण्यासाठी बोपोडीमार्गे जावे लागते. सांगवी बोपोडी दरम्यान मुळा नदीवर बांधण्यात येणाèया प्रस्तावित पुलाचे बांधकाम झाल्यास खडकीमार्गे पुणे शहराकडे जाण्यासाठी अंतर कमी होऊन नागरिकांना बोपोडी व औंधकडे विनावाहतूक कोंडी प्रवास करणे शक्य होणार आहे. सुमारे ३१ कोटी ५२ लाख रुपये खर्च करून ७६० मीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंदीचा हा पूल असणार आहे. या पुलामुळे सांगवी व बोपोडी परिसरात येणाèया जाणाèया नागरिकांना नदी ओलांडण्यासाठी लागणाèया वेळेत बचत होणार आहे. अस्तित्वातील स्पायसर कॉलेज पूल व रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन इंधनाची बचत होणार असून वायु प्रदुषणात घट होणार आहे. शिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे, असेही महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सांगवी ते बोपोडी पुलाचे भूमिपूजन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सांगवी ते बोपोडी पुलाचे भूमिपूजन Reviewed by ANN news network on २/०१/२०२२ ११:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".