प्रभाग ८ मधील विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

पिंपरी : धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने उद्यानांसारख्या नैसर्गिक सानिध्यात वेळ घालवल्यास ताणतणाव दूर होण्याबरोबरच उत्तम आरोग्यही राखले जाईल असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. पालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ येथील सेक्टर क्रमांक १ मध्ये वैष्णोदेवी शाळेसमोर असलेल्या भूखंड ३ मध्ये अद्यावत उद्यान, बहूउद्देशीय हॉल आणि इतर अनुषंगिक कामाचा भुमीपूजन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. भोसरीतील इंद्रायणी नगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, नगरसदस्या सीमा सावळे, नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडिगेरी, संजय वाबळे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, शशिकांत मोरे, सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. पालिकेने लोकोपयोगी कामे करण्याकडे भर दिला आहे. जनतेच्या गरजा विचारात घेऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जात असून अधिकाधिक कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.शहरातील विविध विकास कामे पालिकेच्या वतीने नियोजनबध्द पध्दतीने राबविले जात असून नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे विकासाच्या गतीला अधिक चालना मिळत आहे असे देखील महापौर माई ढोरे म्हणाल्या. प्रभाग क्रमांक ८ येथील सेक्टर क्रमांक १ मध्ये वैष्णोदेवी शाळेसमोर असलेल्या भूखंड ३ मध्ये सुमारे ७ कोटी ८१ लाख रुपये खर्च करुन अद्यावत उद्यान, बहूउद्देशीय हॉल आणि इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे. ९ हजार ९८३ चौरस मीटर जागेत ही कामे केली जाणार आहेत. यामध्ये दुमजली बहुउद्देशीय हॉल, जॉगींग ट्रॅक, अॅम्पिथिएटर, पाथवे, फुटपाथ आणि चिल्ड्रेन प्ले एरिया विकसित करण्यात येणार आहे.
प्रभाग ८ मधील विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन प्रभाग ८ मधील विकासकामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन Reviewed by ANN news network on २/०१/२०२२ ११:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".