चिंचवड गावातील क्रांतिवीर चाफेकर चौकात भाजपचा मशाल मोर्चा

पिंपरी : पंजाबमधील फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत राज्यसरकारने केलेला निष्काळजीपणा हा अक्षम्य गुन्हा आहे आणि काँग्रेस प्रणित पंजाब सरकारचा कट आहे, अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाबात घडलेल्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी चिंचवडगावात आयोजित करण्यात आलेल्या मशाल मोर्चाच्या वेळी ते बोलत होते. शनिवारी पिंपरी चिंचवड भाजपतर्फे चिंचवड गावातील चापेकर चौकातील क्रांतीवीर चापेकर बंधू समूहशिल्प ते चापेकर स्मारक वाडा असा मशाल मोर्चा काढून पंजाब सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी संघटन सरचिटणीस अमोल थोरात, राजू दुर्गे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक राजेंद्र लांडगे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सुरेश गदिया, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, गजानन चिंचवडे, संकेत चौंधे,प्रदिप सायकर, वैशाली खाडे, अजित कुलथे, सचिन राऊत, किरण पाटील, रविंद्र देशपांडे, विक्रम कलाटे, देवदत्त लांडे, मधुकर बच्चे, मोरेश्वर शेडगे आदींसह प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
चिंचवड गावातील क्रांतिवीर चाफेकर चौकात भाजपचा मशाल मोर्चा चिंचवड गावातील क्रांतिवीर चाफेकर चौकात भाजपचा मशाल मोर्चा Reviewed by ANN news network on १/०८/२०२२ ०९:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".